रस्ता काम बंद पडल्याने काढोलीवासीयांना व शेजारी गावांना साेसाव्या लागतात यातना!

0
935

रस्ता काम बंद पडल्याने काढोलीवासीयांना व शेजारी गावांना साेसाव्या लागतात यातना!

विरेंद्र पुणेकर
राजुरा: 20 मार्च काढोली (बूज)। रस्ता काम बंद पडल्याने काढोलीवासीयांना साेसाव्या लागतात यातना काढोली या गावाला बाबापुर, पौवनी, माणोली, गोवारी, चार्ली, निरलीसह आदी गावांतील नागरिकांची सतत ये-जा आसते. चंद्रपूर जाण्यासाठी जवळचा मार्ग असून काढोली येथेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ आसते. येथील चंद्रपूर इथे बाजारपेठ बऱ्यापैकी मोठी असल्याने नजीकच्या गावातील शेतकरी विविध बाबींसाठी चंद्रपूर येथे जातात. परंतु मागील दोन महिन्यापासून काढोली ते चंद्रपूर ह्या रोड चे काम ठप्प आहे, रावडी टाकलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा रोष संबंधित कंत्राटदार कंपनीवर ओढविल्या जात आहे. दोन महिन्यापासून रस्ता खोदून त्यावर खडी दाबल्या गेली होती. परंतु आज दाबलेली खडी पूर्ण पणे उखडली आहे. संबंधित रस्त्यावर पाण्याचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागत आहे त्याने शेतकऱ्यांचे पीक धुडीत मिडाले असे दिसून येत आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीने रस्ता कामाला तत्काळ सुरुवात करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here