अवैधरित्या रेतीची तस्करी! नांदगांव घाटावर दाेन रेतीचे ट्रँक्टर मध्यरात्री जप्त!!🔴🔶किरण घाटे🔶🔴 चंद्रपूर जिल्ह्यात रेतीचे अंदाजे दीडशे घाट असुन या पैकी २०घाटांचे शासनाने नुकतेच लिलाव केले आहे . काही दिवसांपुर्वि महसुल प्रशासन तथा खनिकर्म विभागाच्या फिरत्या पथकांच्या सततच्या कारवायांमुळे रेती चाेरीचे प्रमाण कमी झाले हाेते .परंतु आता परत रेती माफियांनी रात्रीचा फायदा घेत अवैधरित्या रेती नेण्यांचा सपाटा लावला आहे .या बाबतीत जनतेच्या तक्रारी सतत वाढल्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी आता माेहिम उघडुन अश्या रेती तस्करांना धडा शिकविण्यांचा प्रयत्न सुरु केला असल्याचे एकंदरीत दिसून येते .दरम्यान चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाच्या एका पथकाने आपल्या प्राणांची पर्वा न करता चंद्रपूर जिल्ह्यातील गाेंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील रेती घाटावर गुप्त माहितीच्या आधारे धाड घालुन दाेन रेतीचे ट्रँक्टर जप्त केल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे .सदरहु कारवायां चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनखाली खनिज निरीक्षक बंडु वरखडे , भौगोलिक प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर तथा खनिज निरीक्षक दिलीप माेडके यांनी दि.२०मार्चला केल्या आहे.रेतीचे जप्त केलेले वाहने ही अडेगांव येथील सुधीर विठ्ठल राऊत व धर्मराव चाफले यांचे मालकीचे असल्याचे विश्वासनिय सुत्राने या प्रतिनिधीस आज दुपारी सांगितले .या वाहनांचा क्रंमाक अनुक्रमे एम .एच .३४बिआर ५९५७तथा एम .एच. एम.४४२५असा असल्याचे समजते .उपरोक्त जप्त केलेली वाहने महिला पाेलिस पाटील विभा राजू खामनकर यांचे सुपुर्द नाम्यावर ठेवली असुन खनिकर्म विभागाच्या या रात्रीच्या कारवायांमुळे रेती माफियांत अक्षरशा धडकी भरली अाहे .या पूर्वी देखिल याच विभागाच्या गाैण खनिज पथकाने ४३अवैध रेती वाहनांवर गुप्त माहितीच्या आधारे सापाळा रचुन कारवायां केल्या हे येथे उल्लेखनिय आहे .