अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग महिला आघाडी कार्यकारिणी घोषित

0
748

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग महिला आघाडी कार्यकारिणी घोषित

अध्यक्षपदी सौ.संगिता बांबोळे तर सरचिटणीसपदी प्रा.कु. ललिता वसाके यांची नियुक्ती

सर्व साहित्यिक कविवर्य सारस्वत बंधु भगिनी यांच्या सहकार्याने मराठी भाषा संवर्धन आणि नवनवीन साहित्यकृती मराठी मध्ये निर्माण व्हावी, वाढावी, शब्दकोष जोपासावा, अंतर्गत कविसंमेलन, अखिल भारतीय मराठी साहीत्य परिषदेचे साहीत्य संमेलन हे सर्व कार्यक्रम आयोजित करणे या हेतुने अखिल भारतीय मराठी साहीत्य परिषद अनेक वर्षांपासुन कार्यरत आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग (महिला आघाडी)ची कार्यकारिणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांचे मार्गदर्शनाखाली विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी घोषित केली आहे.

नवनियुक्त कार्यकरिणीमध्ये सौ.संगिता देवेंद्र बांबोळे चंद्रपूर (अध्यक्षा),सौ.सुवर्णा प्र.पिंपळकर चंद्रपूर, सौ. चैत्राली वरघट वाशिम (उपाध्यक्षा), ललिता वसाके गडचिरोली (सरचिटणीस), विदर्भ विभाग सहसचिव
कु.दिपाली मारोटकर अमरावती, कल्पना टेंभुर्णीकर नागपूर, प्रा.कल्पना निंबोकार अंबुलकर अकोला (कार्याध्यक्षा), उन्नती बनसोड यवतमाळ,मिताली मोरे बुलढाणा,रचना नगराले वर्धा(संपर्क प्रमुख),प्रियंका भस्मे वर्धा ( प्रसिद्धी प्रमुख), कु.स्नेहा मोरे अमरावती(ग्राफिक्स संयोजिका),सौ.शिवांगी वेरूळकर बुलढाणा,सौ. अर्चना वामन गुर्वे भंडारा(कोषाध्यक्ष), नागपूर विभागीय सन्माननीय सदस्या निकीता डाखोरे भंडारा,
सौ.प्रतिमा सदानंद थोटे भंडारा, वंदना राऊत चंद्रपूर,उषा राऊत नागपूर,आशा चौधरी वर्धा, सुनेत्रा टिकेकर गोंदिया,
अलका साखरे नागपूर, भारती तिडके गोंदिया
अमरावती विभागीय सन्माननीय सदस्या सौ. अश्विनी घुले बुलढाणा, सौ .मीना फाटे बुलढाणा,मनीषा शं.मडावी बुलढाणा,वैष्णवी काले अमरावती,सौ.कल्पना गायकवाड आदींचा समावेश आहे.

कार्यकरिणीतील सर्व सदस्या, पदाधिकारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महिला आघाडी विदर्भ विभाग यांनी मराठी भाषा संवर्धन आणि साहीत्यकृती निर्माण करण्याचा वसा पुढे न्यावा. सर्व साहीत्य संमेलन आणि कवीसंमेलन या कार्यक्रमात सहभाग घेऊन सर्वांचे सहकार्य लाभावे अशीअपेक्षा नवनियुक्त अध्यक्षा सौ.संगिता बांबोळे यांनी व्यक्त केली.

नवनियुक्त सर्व महिला पदाधिकारी यांचे नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकूवर, सरचिटणीस जयेंद्र चव्हान,सचिव मंगेश जनबंधु, उपाध्यक्ष सुजित वनकर,कार्याध्यक्ष दिनेशकुमार अंबादे,प्रसिद्धी प्रमुख पंकज वानखेडे,सदस्या सौ.संगिता ठलाल,सौ.सरिता रामटेके,प्रा.नूरजहाँ पठाण,अमरावती विभाग अध्यक्ष विशाल पाटील वेरुळकर,नागपूर जिल्हाध्यक्षा सौ.किरण पेठे,भंडारा जिल्हाध्यक्ष नाशिक चवरे,गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनेवाने, गडचिरोली जिल्हाध्यक्ष माणिकचंद रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गुळधाने तसेच सर्व जिल्हा,तालुका कार्यकरिणीतील पदाधिकारी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीकरिता शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here