अखेर बंगाली कॅम्प वासीयांना ३५ वर्षा नंतर मिळालं हक्काच पाणी

0
700

अखेर बंगाली कॅम्प वासीयांना ३५ वर्षा नंतर मिळालं हक्काच पाणी

प्रहारच्या पाठपुराव्याला व आंदोलनाला यश

प्रवीण मेश्राम । गडचांदूर शहरात गेल्या पस्तीस वर्षांपासून अनेक मूलभूत सुविधा पासून बंगाली कॅम्प हा भाग वंचित आहे. पाणी, वीज, रस्ता, नाली, बालकांसाठी अंगणवाडी अश्या अनेक सुविधा आजही एकविसाव्या शतकात यांना मिळत नाही. 35 वर्षापासून अनेक पत्र व्यवहार केले पण कम्पणीच्या समोर कोणाचीच चालली नाही उलट त्यांच्या पदरात निराशाच पडली. दोन अडीच वर्षे पहिले त्यांना प्रहार बद्दल कुणीतरी माहिती दिली. सम्पूर्ण बंगाली कॅम्प वासी प्रहारचे माजी तालुका अध्यक्ष सतिश बिडकर यांच्या कडे येऊन आपली समस्या मांडली. बिडकर यांनी बंगाली कॅम्प वासीयांना सोबत बंगाली कॅम्प परिसरात जाऊन पाहणी केली असता अक्षरशा डोळ्यातून पाणी येईल अशी परिस्थिती लक्षात आली. अनेक नेते आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी येऊन गेले अश्वासन दिले पण ते दर वेळेस वाणी हवेतच विरले. अशी प्रतिक्रिया बंगाली कॅम्प वासींकडून एकाला मिळाली.
बिडकर यांनी सांगितले या प्रकरणात जातीने लक्ष दिले जातील व समस्या नक्की दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तिथून सुरु झाली प्रहार ची लढाई! प्रहार मार्फत आधी सम्पूर्ण विषयाबद्दल माहिती घेण्यात आली काही माहिती माहितीच्या अधिकारात काढण्यात आली यावरून लक्षात आले की माणिकगड कंपनी याना सुविधा पासून दूर ठेवत नसून काही विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी माणिकगड कम्पनी सोबत मिलीभगत करून बंगाली कॅम्प वासीयांना मूलभूत सुविधा पासून वंचीत ठेवण्यात येत आहे तर 2020 च्या विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण बंगाली कॅम्प वासीयांनी प्रहारच्या माध्यमातून बहिष्कार टाकण्यात आला त्या वेळेस अनेक लोक प्रतिनिधी बंगाली कॅम्प वासीयांना येऊन भेटून त्यांना पुन्हा आश्वासन देत होते पण त्या वेळेस गाठ प्रहार शी पडली आणि 100% मतदानावर बहिष्कार यशस्वी झाला त्या नंतर कोणताच लोकप्रतिनिधी त्या बंगाली कॅम्प वासीयांकडे फिरकले नाही .
काही दिवसांनी दीड वर्ष आधी नगर परिषद च्या मुख्यधिकारी याना पाण्या विषयी प्रहार ने सम्पूर्ण बंगाली कॅम्प वासीयांना घेऊन घेराव टाकला व या घेरावला पाहून मुख्यधिकारी यांनी एक हातपंप लवकरच देऊ असे आश्वासन दिले अखेर त्या अश्वासनाला दीड वर्ष निघून गेले प्रहार तर्फे पाठपुरावा सुरूच होता तात्कालीन जिल्हाअधिकारी यांना पण पत्र व्यवहार केला त्यांनी याबाबत मौन च ठेवले आणखी एकदा नवनियुक्त जिल्हाधिकारी अजय गुलहाने याना आधीचे सर्व निवेदन जोडून नवीन निवेदन देण्यात आले त्यांनी त्यावर तात्काळ त्या विभागातील अधिकाऱ्यांची सभा बोलावली सभेत नगर परिषद ने आठ दिवसात नळ व हातपंप लावून देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबाना दिले या मध्ये कोणतीही आडकाठी दाखवण्यात आली नाही पण 35 वर्षापासून माणिकगड कम्पनी ची आडकाठी दाखवून त्या रहिवास्याना पाण्या पासून वंचीत ठेवले यावर दोषी कुणाला मानावे हेच कळत नाही त्याच हेतूने आज नगर परिषद मार्फत तीन नळ लावून बंगाली कॅम्प वासीयांची पाण्याची तहान भागवली तर काही दिवसात हातपंप सुद्धा लावून देणार असे नगर परिषद च्या मुख्यधिकारी यांनी सांगितले.

खरी लढाई आता राहील विजे बाबत पाठपुरावा झाला असून लवकरच बंगाली कॅम्प प्रकाशमय होणार असे बिडकर यांनी सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णमित्र मा गजु भाऊ कुबडे चंद्रपुर जिल्हा सम्पर्क प्रमुख यांच्या भेटीने बंगाली कॅम्प वासीना एक आशेचा किरण दिसणे सुरु झाले होते गजुभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंगाली कॅम्प च्या समस्या विषयी बैठक पार पडली.
“35 वर्षांपासून एकाच हातपंपावर 90 ते 100 कुटुंब पाण्याची तहान भागवत होते गेल्या अडीच वर्षांपासून प्रहार तर्फे पाठपुरावा करत मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नगर परिषद ने आठ दिवसात नवीन नळ व बोरिंग मारून पाण्याची समस्या निकाली काढू असे आश्वासन मा जिल्हाधिकारी साहेबानसमोर देण्यात आले व नगर परिषद ने ते काम चोख पणे पूर्ण केले.”
रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे
चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here