बालक व बालिकांनी समाजाचे सैनिक व्हावे- कुसुमताई अलाम🟠🔶🔶🔶🔶🔶🔶गडचिराेली🟡किरण घाटे🔴 आजचे बालक उद्याचे उत्तम नागरिक होऊन आपले व आपल्या गावाचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी समाज सैनिक बनावे असे मनाेगत आदिवासी साहित्यिक तथा गडचिराेलीच्या सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम यांनी व्यक्त केले .त्या दि.१७मार्चला गडचिराेली जिल्ह्यातील काेटगल येथील आँडिट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बाेलत हाेत्या. दिवसेंदिवस असुरक्षितता वाढीस लागली असल्याच्या त्या पुढे म्हणाल्या . महिला बाल सुरक्षा सुनवाई या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालक व महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही ठराविक ठिकाणे आहेत का याचे आँडिट बालक व बालिकांनी चिठ्ठ्या लिहून नाव न लिहिता आपल्या समस्या लिहिल्या अतिशय हा आगळावेगळा प्रयोग हाेता.उपयुक्त कॅलेंडर चे प्रकाशन या वेळी करण्यात आले.कार्यक्रमाला गुरुदास समस्कर माजी सरपंच वैशालीताई पोरड्डीवार, मान्यवर महिला सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या .ज्योतीताई मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर गीता गुडी यांनी आभार मानले