घानमाकड नामशेष होण्याच्या मार्गावर
आधुनिक युगातील मुले ‘स्मार्टफोनकडे’
ग्रामीण भागातही दिसेनात मैदानी खेळ
आशिष गजभिये
चिमूर । होळीपूर्वी ग्रामीण भागात पूर्वी शिंमगोत्सव साजरा केला जात होता.यात घानमाकड हा पारंपरिक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आधुनिक युगात मुले,युवक मोबाइलच्या जाळयात अडकले आहेत.नको असलेल्या वस्तू मुलांच्या हाती आल्या आहेत.मोबाईल ,इंटरनेट,संगणकाच्या युगात पारंपरिक खेळ नष्ट होत आहे हा बदल केवळ शहरी भागातच नसून भागातच नसून ग्रामीण भागातही झाला आहे.या मुळे घानमाकड खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.विशेष म्हणजे असा काही खेळ असते हे आताच्या मुलांना सांगूनही खरं वाटणार नाही.
पूर्वी फाल्गुन महिन्याची सुरुवात होताच होळीची चाहूल लागायची.यात दुसऱ्या दिवशीच्या रंगपंचमीला विशेष महत्व असायचे त्या साठी महिनाभरापासून ग्रामीण भागात युवक मुले घानमाकड तयार करून होळीची तयारी करीत होते.लहान मुलांचा हा आवडता खेळ होता.घानमाकडावर गोल फिरण्यात बच्चे कंपनी दंग व्हायची.मात्र आता हा खेळच लुप्त पावत आहे. फाल्गुन महिन्यात उन्हाचा पारा चढत असताना रानात पानगळ सुरू होते.डोउलदार वृक्ष या मुळे बोडके होऊ लागतात.मात्र पळस फुलांची लाल चादर बोडख्या वृक्षांवर पांघरलेली दिसते. पूर्वी रंगमंपंचमी साठी हीच फुले गोळा करन्यासाठी मुले रानात जायची जंगळातूनच धनुष्याच्या आकाराचे व एक सरळ खांबासारखे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे.या घानमाकडीच्या दोन्ही बाजूवर बसून लहान मूल व युवक गोल – गोल फिरत होते.घानमाकड धूम म्हणून गोल झोक्याच्या आनंद लुटत होते. पण आता हा प्रकार बदलला असून आता पळसाच्या रंग ऐवजी पर्यावरनाचा ऱ्हास करणारी कृत्रिम रंग आणून रंगपंचमी साजरी केली जाते.
________________________
सणांचे महत्व टिकणार कसे ?
आधुनिक युगात पारंपरिक सण,महोत्सव लुप्त होत आहेत.सोशल मिडियावरील प्रचाराने सणांचा काही अंशी खरा इतिहास समाजासमोर येत आहे. अनिष्ट रूढी,प्रथा,परंपरा कुणालाही नकोच.मात्र ज्यातून मुलांचा आनंद जोपासला जातो, असे काही सण,उत्सव जपने गरजेचे आहे.त्यातीलच होळी आणि रंगपंचमी हा सण आहे. आजच्या युगातील संगणक ,स्मार्टफोन मध्ये व्यस्त असलेल्या मुलांना या सणांचा विसर पडला ,परिणामी हा पारंपारिक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.आजही काही ठिकाणी हा खेळ जपला जातो. हा खेळ जपून या तुन मुलांना त्यांचा आनंद मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.