आज पहिला विमान प्रवास!
🔶🟡चंद्रपूर🔶🔴किरण घाटे🔴महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका तथा वैदर्भिय जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे यांनी विमान प्रवासातील आपले अनुभव या अल्पश्या लेखातुन शब्दांकित केले आहे .ते खास वाचकांसाठी या ठिकाणी देत आहाे !
🔶🟣लहानपणापासून आकाशात विमान पाहिलं की खुप नवल आणी कौतूक वाटायचं.
आणि विमानाचा आवाज आला की धावत अंगणात जाऊन किलकीलत्या डोळ्यांची पांढऱ्या ढगात ते शोधायचे….चिमुकले विमान दिसले की किती आनंद…..
आणि मग दूर जाईपर्यंत बघत राहायचे…..
या आकाशातल्या विमानाचे नेहमीच अप्रूप वाटत होते .आणि आपणही कधीतरी या विमानात बसू आणि आकाशातून खालचे जग कसे चिमुकल्या खेळासारखे दिसते ते बघू…..
परिकथेतली परी ढगात कशी अलगत तरंगते आणि पौराणिक गोष्टीतले सारे पात्र आकाशात कसे तरंगत असातील हा बालमनात नेहमीच प्रश्न होता. पण ते कुतूहल प्रत्यक्ष पाहून अनुभवण्याचा योग काही येत नव्हता.
परदेश वारी नाही तर कमीत कमी देशात तरी एखादा विमानप्रवास करावा असं सारखं वाटायचं. पण नेहमी काही न काही कारणांनी ते राहूनच गेलें! घरचे सर्वांनीच केलायं प्रवास पण मी विषय काढला की…. त्यात काय विशेष म्हणून ……
हो ….तेही खरचं… नेहमी प्रवास करणाऱ्याला कदाचित याचे काही वाटणार नाही
पण कोणतीही बाब पहिल्यांदा करताना त्याचे कौतुक , अप्रूप असतंच…..
आणि यावेळेस तो योग जुळून आला… आमची पुतणी वैभवी विनायक धोटेच्या विवाहाच्या निमित्ताने…..
लग्न दिल्लीला….. आणि परतीचा प्रवास विमानाने असे ठरले……
हो नाही म्हणता म्हणता आमचे जाणे ठरले ….
आणि विमान प्रवासही….
आज पहिल्यांदा विमानतळ आणि विमान जवळून पाहिले…
हा अनुभव एकदम मस्त….
लहानपणी ते आकाशातले विमान , मी खिडकीजवळची सीट मिळवली आणि आकाशात उडाली….. आकाशपाळण्यात बसल्यासारखे वाटले उडताना..
आणि मग गाव, रस्ते, नदी, जंगल अगदी छोट्या प्रतिकृतीसारखे…..
ढगातून उडलो आम्ही आणि नागपुरला सेफ लँडिंग ही केली… धन्यवाद विनायकराव धोटे… आज हा पहिला विमान प्रवास तुमच्यामुळे घडला…..!
आता आकाशात विमान बघताना मी ही म्हणेन..
.मी ना… उडले होते ढगात
गेले होते परिराज्यात…
मारला जरा फेरफटका भारतातल्या आकाशात…
असेच एक दिवस पुन्हा
भारताबाहेरचे आकाश बघेन…
या अवनी वर पुन्हा एकदा फेरफटका
मारेल….✈️
🔶मेघा रामकृष्ण धोटे, सहजं सुचलं महिला व्यासपीठ संयाेजिका
राजुरा जि.चंद्रपूर