अडपल्ली -गोगाव येथील गोंडवाना विद्यापीठाकरिता अनिवार्य भूसंपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा : आमदार होळी
आमदार डॉ. देवरावजी होळी यानी अडपल्ली येथे आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत विद्यापीठाला जमीन देण्याबाबत शेतकरी सकारात्मक
सुखसागर झाडे । ६० शेतकऱ्यांची ६४.८० हेक्टर जमीन सरकार सक्तीने अधिग्रहण करण्याच्या प्रयत्नात अडपल्ली गोगाव येथील गोंडवाना विद्यापीठाकरिता अधिग्रहित करण्यात येणारी जमीन सरकार अनिवार्यपणे भूसंपादित करण्याच्या प्रयत्नात असून त्यापूर्वी शासनाने स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेऊन मंजूर कराव्यात त्यानंतरच त्यांची जमीन अधिग्रहित करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
आज अडपल्ली गोगाव येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गोंडवाना विद्यापीठात जमीन हस्तांतरण होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली. बैठकीला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या अडचणी व समस्या मांडल्या. ही सर्व जमीन गोगाव उपसा सिंचन योजनेत असूनही ती ओलिताखाली न दाखविल्यामुळे अनेक शेतकरी दीड पट लाभापासून वंचित राहणार आहेत त्यामूळे सदर जमीन ओलिताखाली असल्याने तसे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली. यापूर्वी जमीन अधिग्रहीत करतांना २५ लक्ष रुपये एकरी दर आकारण्यात आला होता. परंतु आता तो दर कमी करून १२.५० लाखावर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे जमिनीचे नवीन मूल्यांकन करून किमान 25 लक्ष रुपये एकर जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली. सदर शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून आपण शासनाकडे या मागणीसाठी पाठपुरावा करून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्याकरिता आपण लवकरच मुंबई येथे मंत्र्यांची भेट घेऊन सदर निकाल लवकर लागावा याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना केले.