टोल नाक्यांवरील बाहेर राज्यातील कर्मचारी काढून मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी मनसेचा यलगार
कोरोना काळात आमच्या स्थानिक मराठी तरुणांनी टोल नाक्यावर दीली होती सेवा
आता त्याच टोल कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा टोल वर प्रकार
मनसे जिल्हा अध्यक्ष अतूल वांदीले यांच्या नेतृत्वात टोल वर आंदोलन, नाक्यावर कायम स्वरुपी ॲम्बुलन्स ठेवण्याची मागणी
हिंगणघाट, अनंता वायसे । राष्ट्रिय महामार्गावरील दारोडा टोल नाक्यावर स्थानीक कर्मचाऱ्यांन विरोधात षडयंत्र रचून त्यांना बेरोजगार करण्याची योजना आखली जात असताना आता मनसे आक्रमक झाली आहे. बाहेर राज्यातून आलेल्या टोल व्यवस्थापकांनकडून स्थानिक मराठी तरुणांनी कामावरून कमी केल्या जात आहे. वेगवेगळी कारणे सामोर करुण त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली जात आहे. असल्या प्रकारचा अन्याय मनसे कदापी खपवून घेणार नसुन टोल विरुध्द मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसे जिल्हा अध्यक्ष अतुल वांदीले यांनी दिला आहे. हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी राष्ट्रीय महामार्गावरील दारोडा शिवारात असलेल्या टोल चालवित आहे. या टोलवर टोल व्यवस्थापक म्हणून बाहेर राज्यातील कर्मचारी नेमले आहेत. आता ही व्यवस्थापक म्हणून नेमलेली बाहेर राज्यातील मंडळी स्थानिक मराठी युवकांना कामावरून कमी करत आपल्या राज्यातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्रात अनेक जागी आंदोलने केलेली आहेत आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये असलेल्या दारोडा येथील टोल नाक्यावर स्थानिक युवकांना बेरोजगार करत असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांना मिळालेली यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले हे आक्रमक झाले असून त्यांनी आज टोल नाक्यावर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाऊन आंदोलनाचा इशारा दिलेला आहेत. तसेच कुठल्याही टोलनाक्याच्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक वाहनचालकांना टोल नाक्यावर सूट दिलेली असताना देखील या टोल नाक्यावर स्थानिक वाहनचालकांकडून पैसा उकळण्याचा प्रकार सुरू आहेत तर पुलगाव देवळी हिंगणघाट व अन्य पाच किलोमीटरच्या बाहेरील चार चाकी वाहनांना पाच किलोमीटर आतील वाहन धारक दाखवत टोल नाक्यावर सूट दिली जात आहे. यासाठी म्हणून प्रत्येक चार चाकी दहा चाकी वाहन धारकाकडून दहा हजार रुपये प्रतिमहिना बेकायदेशीर रीत्या टोल व्यवस्थापक घेत असल्याची माहिती मनसेला मिळालेली असून या विरुद्ध मनसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर देखील या टोल घोटाळ्यात टोल व्यवस्थापकास पाठबळ देत असल्याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देखील याबाबत निवेदन दिले जाणार आहेत पुढील काही दिवसात मनसेच्या माध्यमातून टोलच्या संदर्भात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असे मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांची तक्रार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर , सुनिल भुते, प्रवीण श्रीवास्तव , रमेश घंगारे, सुधाकर वाढई, राहूल सोरटे,जयंता कातरकर उमेश नेवार , मारूती महाकाळकर, राजू सिंन्हा, शेखर ठाकरे किशोर भजभुजे, अजय परबत, प्रशांत येकोंनकर, जितेंद्र रघाताते, , सतीश गुर्नुले. भोला इंगोले दीपक चंद्वानी सय्यद मामू ,
संजय गाभुळे, नितीन भुते, आकाश हुरले, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, गोलू भुते, राहूल जाधव, सचिन बढे, दिनेश पिसे, आदित्य भूते सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.