अखेर उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्के अनुदान व 20 टक्के घेत असलेल्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर
आमदार प्रतिभाताई धानोरकर व आमदार अभिजीत वंजारी यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर : अनेक दिवसापासून अनुदानाचा प्रश्न प्रलंबित असून हा प्रश्न सुटावा यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी आंदोलने केली मोर्चे केले. राज्यातील प्रत्येक घटकाकडून अनुदानाची मागणी सातत्याने केली जात होती परंतु हा प्रश्न महा विकास आघाडीने आता सोडविला आहे. यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर व आमदार अभिजीत वंजारी यांनी सातत्याने शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या भेटी घेऊन हा प्रश्न लवकर सोडवावा अशी विनंती त्यांना केली. त्यासाठी दोन्ही सभागृहात सुद्धा मागणी लावून धरली त्यामुळे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी चालू अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर केली मंजूर केलेल्या पुरवणी मागणीचा निधी वितरणाचा आदेश निघावा म्हणून आमदार महोदयांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा झाला त्याबद्दल सर्व स्तरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पुढील काळात प्रचलित नियमानुसार शाळांना अनुदान मिळावे यासाठी आमदार महोदय प्रयत्न करतील असा शिक्षकांना आता विश्वास निर्माण झाला आहे.