चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या लसीकरण केन्द्रांना भेटी ! जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी !

0
697

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या लसीकरण केन्द्रांना भेटी ! जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी !
चंद्रपूर 🟠🟣किरण घाटे🟡🟢
कोरोना लसीकरण केंद्रावर येणा-या नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, प्रत्येक केंद्रावर थंड पिण्याच्या पाण्याची व नागरिकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात यावी तसेच सकाळ, संध्याकाळ अशा दोन वेळेस कोरोना लसीकरण करण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधीत विभागाला केल्या आहे.
आज मंगळवार पासून सुरु करण्यात आलेल्या बाबूपेठ व इंदिरा नगर येथील कोरोना लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेटी दिल्या असून नागरिकांच्या सुविधे संदर्भात महत्वाच्या सुचना केल्या आहे. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अविष्कार खंडारे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक विश्वजित शाहा, दूर्गा वैरागडे तापूष डे, राशिद हुसेन, महेश काहीरकर, सविता दंडारे, आशा देशमूख आदिंची उपस्थिती होती.
मध्यंतरी आटोक्यात आलेला कोरोना पून्हा वाढू लागला आहे. दिवसाला शेकडो रुग्णांचा अहवाल पॉझेटीव्ह येत असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन न जाता सर्तक राहण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. दरम्यान आज पासून सुरु करण्यात आलेल्या बाबूपेठ व इंदिरा नगर येथील कोरोना लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत येथील कामाची पाहणी केली. उन्हाचा पारा दिवसांगणीक चढत आहे. त्यामूळे येथे लसीकरणासाठी येणासाठी येणा-या वयोवृध्द नागरिकांना येथे पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात यावी, त्यांच्या बसण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, तसेच कोरोना लसीकरणासाठी येणा-या नागरिकांची गर्दी लक्षात घेता सकाळ सह आता संध्याकाळीही कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित विभागाला दिल्या आहेत. तसेच यावेळी आ. जोरगेवार येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशीही चर्चा करुन त्यांच्या अडचणी व समस्या जाणुन घेतल्या . लसीकरणासाठी समोर आल्याबद्दल आ. जोरगेवार यांनी नागरिकांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here