गोंडपिपरीत पत्रकार भवणासाठी आमदार सुभाष धोटे यांनी केले २० लक्ष निधी मंजूर
गोंडपिपरी(सूरज माडूरवार)
जिल्ह्याच्या पत्रकारितेत गोंडपिपरी पत्रकार संघाची वेगळी ओळख आहे.येथील १९ पत्रकारांनी एकत्र येत स्वतः अडीज एकर जागा खरेदी करून पत्रकार कॉलनी निर्माण करण्याचा संकल्प केला.त्याच अनुशंगाणे पत्रकारांना व सर्व सामान्य नागरिकांना पत्रकार परिषद आयोजित करण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून आमदार सुभाष धोटे यांनी २० लक्ष निधी मंजूर केला.
दि.१६ मंगळवार आमदार धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.नगरपंचायत प्रशाशकीय इमारत बांधकामाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमा दरम्यान आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर केलेल्या निधीचे पत्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी आमदार सुभाष धोटे,तहसीलदार के.डी मेश्राम,नगराध्यक्ष राजुरा अरुण धोटे,सपना साखलवार,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश चौधरी,सरपंच पोडसा देविदास सातपुते,अशोक रेचनकर,युवक तालुका अध्यक्ष संतोष बंडावार,माजी उपसरपंच गौतम झाडे,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष विनोद नागापूरे, राजू झाडे,सचिन फुलझले,राजीवसिंह चंदेल,सादिक शेख, यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पत्रकार भवणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण वासलवार यांनी समाधान व्यक्त केले असून, पत्रकार संघ गोंडपीपरी. समाजातील प्रत्येक घटकाला लेखणीतून न्याय देनार अन्यायाला वाचा फोडणार असा विश्वास व्यक्त केला.