‘ती जागा अतिक्रमणची नाही, खाजगी मालकीचीच’ मायाताई वाघाडेंचा दावा!
किरण घाटे
गाेंडपिपरी । एका वैदर्भिय वृत्तपत्रात प्रसिध्द केलेल्या बातमीच्या अनुषंगाने “ती जागा अतिक्रमण नव्हे तर खाजगी मालकी हक्काची अाहे.” असा दावा मायाताई पितांबर वाघाडे यांनी केला आहे. जमीन बाबत केलेला आरोप बिनबुडाचे असुन स्थानिक पुरातन महादेव मंदिराचा जागेचे बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप सुध्दा बिनबुडाचा असुन ही जागा अतिक्रमणाची नव्हे तर मौजा-गोंडपिपरी सर्है नं. ५९, आराजो ०.०६ (६००० चौ.फुट) जागा माझे सासरे नानाजी कारु वाघाडे व इतर यांचा खाजगी मालकीची अाहे उपराेक्त खाजगी जागेवर तसेच भुमापन कं. २६८, शिट नं. १९, आराजी ३६.०० चौ.मि. ही सुध्दा जमीन नानाजी कारु वाघाडे व इतर यांच्या खाजगी मालकीची अाहे. सदरहु जागेवर वाघाडे यांचे परिवाराचे मंदिर असुन त्यामध्ये आंगणवाडी चालविण्याकरीता राजीखुशीने देण्यात आलेली आहे. जमीनीचे मालकी हक्काचे दस्ताऐवज आपणा कडे उपलब्ध असुन सदरहु जमीनीचा रेकार्ड तलाठी यांचेकडे अस्तीत्वात आहे. असा दावा निवेदनातुन सादर केला आहे. निवेदनानुसार जागेवरील पुरातन महोदव मंदिरच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच उदभवत नाही ही जागा खाजगी मालकीची आहे. गांवातील राजकीय कार्यकर्ता नगरपंचायत २०२१ निवडणुक लक्षात घेता गांवातील लोकांना / जनतेला सदर जागेवर नळाची पाईप लाईन टाकुन देतो असे खोटे आश्वावन देवुन जाणीवपुर्वक खोटी माहिती देवून प्रशासनाची दिशाभुल करीत आहे.अश्या खोट्या तक्रारी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी व तहसिलदार गोंडपिपरी यांचेकडे जनतेचा खोट्या सहया घेवुन सादर करीत आहे. सदरहु जमीनीच्या बाबतीत चौकशीला समोर जाण्यास मी केव्हाही तयार आहे. माझ्याकडे असलेले सर्व दस्तऐवज खरे असुन विराेधकांच्या षडयंत्राला मी कदापी घाबरणार नाही. असे निवेदनात मायाताई वाघाडे यांनी नमुद केले आहे. मरेश नैंवडे, अरुण तुंबडे, सम्राट भडके, अरुण धुडसे या कार्यकर्त्यांनी माझी वृत्तापत्राद्वारे बदनामी केली असुन त्यांच्या विरुध्द मानहानी दावा टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे यांनी दिला असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकातुन मायाताई पितांबर वाघाडे यांनी कळविले आहे.