भंगाराम तळोधीच्या बॅकेत लाखो रूपयाचा घोळच घोळ
बॅक आॅफ इंडियाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांयकडून कार्यवाहीस विलंब
गोंडपिपरी:- (सूरज माडूरवार)
एका मेंढपाळाचे साडेतीन लाख रूपये खात्यातून गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार भंगाराम तळोधी येथे मागील आठवडयात उजेडात आला होता.आता पुन्हा दुसरा गंभीर प्रकार घडला आहे.एका मेढपाळ आणी शेतकÚयाने पाच लाख चाळीस हजार रूपये जमा केले.पण त्यांच्या खात्यातून चक्क चार लाख विस हजार रूपयाची रक्कम गायब झाली आहे.या प्रकाराने अन्यायग्रस्त पंच्रड मानसिक तणावात आहेत.तर दुसरीकडे वारंवार अनेेक बोगस कारनामे समोर आल्यानंतरही बॅकेच्या वरिष्ट अधिकाÚयाकडून याची कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही.यामुळे मिलीभगतातून हा संपुर्ण गैरप्रकार केल्या जात असल्याचे आता बोलल्या जात आहे.
भंगाराम तळोधी येथील मेंढपाळ मल्ला पोचा बोरलावार यांनी आपल्या मेंढया विकून एकून आठ लाख चाळीस हजाराची रक्कम वेगवेगळया तारख्ेाला बॅक आॅफ इंडियाच्या भं.तळोधी शाखेत जमा केले.आता त्याला कौंटुबिक कामासाठी त्याने 5/3/2021 ला हि रक्कम काढण्यासाठी बॅकेत गेला असता तब्बल साडेतीन लाख रूपये ची तफावत आढळून आली.विशेष म्हणजे सदर पैशाचा भरणा त्यांनी एकाच वेळी केला होता.आणी तशा पावत्या देखिल त्याच्याकडे उपलब्ध आहेत.हा प्रकार अन्यायग्रस्ताने उचलून धरल्यानंतर बॅकेच्या ग्राहकात एकच खळबळ माजली.बॅकेत आपलीच रक्कम सुरक्षीत नसल्याचे वाटू लागल्याने अनेकांनी बॅकेत चैकशी करून आपल्या खात्यातील रक्कम जाणून घेतली.याप्रकरणची धार अजूनही कायम असतांनाच पुन्हा दुसरा मोठा गैरप्रकार उघड झाला आहे.भंगाराम तळोधी गावातीलच बिरा पोचू मुर्कीवार याचा मंेढपाळ व शेतीचा व्यवसाय आहे.त्याने या व्यवसायातून कमविलेेली एकून पाच लाख रूपयाची रक्कम भं.तळोधी येथील बॅक आॅफ इंडियाच्या शाखेत तिन टप्प्यात जमा केली.बचत खाता क्रं. 962110100002919 मध्ये 19 आॅगष्ट 2019 रोजी एक लाख रूपये, 25 जून 2020 ला दोन लाख रूपये तर 13 आॅक्टोंबर 2020 रोजी बिराने पुन्हा दोन लाख रूपयाची रक्कम जमा केली.परंतू बॅक पासबूकावर एवढया रक्कमेची इन्ट्रीच नसल्याचे त्यांनी सांगितले.पाच लाख रूपयापैकी केवळ एक लाख रूपये जमा असून उर्वरित चार लाख रूपये गहाळ झाले आहेत.विशेष म्हणजे जमा असलेल्या एक लाख रूपयाची रक्कम मागील प्रकरणाप्रमाणेच याही घटनेत पाच पाच हजार रूपयाची एन्ट्री करित बॅकेने जमा केली.तब्बल चार लाख रूपये गहाळ झाल्याने बिरा पोचू मुर्कीवार यांना प्रचंड धक्का बसला आहे.
चेकदरूर येथील आशा गिरीधर चैधरी या शेतकरी महिलेने आपला कापूस विकून जमा केलेली चाळीस हजार रूपयाची रक्कम बॅकेत जमा केल्यानंतर खात्यामध्ये केवळ विस हजार रूपयेच जमा आहेत.या प्रकरणासंदर्भात 12 मार्च रोजी ग्राहकाने बॅकेत जाउन विचारणा केली असता दोन मिनीटात पासबूकावर उर्वरित रक्कम टाकतो असे सांगितले.मात्र अजूनपर्यत रक्कम जमा झाली नाही.
या संपुर्ण प्रकरणानंतर भंगाराम तळोधी येथील शाखा व्यवस्थापक मिथून बारसागडे प्रचंड वादाच्या भोवÚयात सापडले आहेत.एवढया मोठया प्रमाणावर खात्यातून रक्कम गहाळ कशी होत आहे.हा प्रश्न आहे.यामध्ये अनेकांचे हात गुंतल्याचा संशय निर्माण झाला आहे. बॅक आॅफ इंडियाच्या वरिष्ठ स्तरावर याप्रकरणाची तक्रार करण्यात आली असून ते याकडे पुरते दुर्लक्ष करित असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.
—————————————–
भंगाराम तळोधी बॅक आॅफ इंडिया शाखेतील ग्राहकांचे लाखो रूपयाचे गहाळ होत असल्याचे अनेक प्रकार दिवसांेदिवस समोर येत आहेत.पण याची चैकशी करण्याचे साधे सौजन्य वरिष्टांनी दाखविले नाही.यामुळे मिलीभगतातून हा प्रकार करण्यात तर येत नाही अशी शंका निर्माण होत आहे
मारोती अम्मावार,माजी उपसरपंच भंगाराम तळोधी