आज मार्कंडा देवस्थानात भाविकांच्या वतीने आमदार डॉ देवराव होळी यांचे शिवलिंगाचे प्रथम दर्शन!
महाविकास आघाडी सरकार व जिल्हा प्रशासनास धारेवर धरले नंतर तमाम शिवभक्तांना आजपासून दर्शनाची अनुमती!
विदर्भातील भाविक भक्तांच्या वतीने आमदार डॉ देवराव होळी यांचे हार्दिक अभिनंदन!
सुखसागर झाडे । विदर्भाची काशी असणाऱ्या मार्कंडा देवस्थान आज दि. १३ मार्च पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले असून ज्या भाविकांना मार्कंडेश्वराचे दर्शन करावयाचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने,तहसील कार्यालय , किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपली नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ, देवरावजी होळी यांनी भाविकांना केले आहे.
भगवान मार्कंडेश्र्वराच्या दर्शनासाठी गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लाखों भाविक महाशिवरात्रीच्या कालावधीत येत असतात परंतु यावर्षी प्रशासनाने दर्शनासाठी बंदी घातल्याने लाखों शिवभक्त भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाही अकारण मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद करण्यात आल्याने आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्य शासनाचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता त्या आंदोलनाच्या ईशाऱ्याचा सकारात्मक परिणाम होवून मंदीर आज शनिवार सकाळ पासून प्रशासनाच्या वतीने मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे त्या अनुषंगाने आमदार डॉ देवराव होळी यांनी आज स्वतः उपस्थित राहून मर्कांडा देवस्थान येथे प्रथम पूजन करून दर्शन घेतले.
आमदार डॉ देवरावजी होळी यांनी भाविक भक्तांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देऊन सदर मागणी केली होती व त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता भाविकांना भगवान महादेव व मार्कंडेश्र्वराचे दर्शन घेता येणार आहे या बद्दल समस्त विदर्भातून आमदार डॉ देवराव होळी यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजानन भांडेकर ,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा भाजपा तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे, ज्येष्ठ नेते जयराम चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.