गडचिरोली – चामोर्शी पंचायत समितीच्या व गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्या

0
697

गडचिरोली – चामोर्शी पंचायत समितीच्या व गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्या

आमदार डॉ देवरावजी होळी यांची जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे. मागणी

विधानभवन मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची केली विनंती

चामोर्शी पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनासाठी ७ कोटी ३६.५० लक्ष व गडचिरोली पंचायत समितीच्या भवनासाठी ६ कोटी ६६ लक्ष तर गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांची केली मागणी

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनासाठी ७ कोटी ३६.५० लक्ष व गडचिरोली पंचायत समितीच्या भवनासाठी ६ कोटी ६६ लक्ष रूपयांचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुर करून निधी उपलब्ध करुन द्यावा तर नगर विकास मंत्रालयामार्फत गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत करिता ५ कोटी रुपये मंजुर करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुंबई येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन केली*
*चामोर्शी व गडचिरोली येथील पंचायत समितीच्या इमारती निर्लेखीत झालेल्या असून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणेआवश्यक आहे. याबाबत आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी वारंवार आढावा बैठकीतून पाठपुरावा करीत असून तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. आता याबाबतचे प्रस्ताव शासन स्तरावर असून या प्रस्तावाला गडचिरोली जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतून मंजुर करून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा तर गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय भवणासाठी नगर विकास मंत्रालयाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे नगर विकास मंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here