एका महिण्याच्या आत सिएसटीपीएस येथील कामगारांना 20 टक्के वेतन वाढ दया – आ. किशोर जोरगेवार

0
453

 

कामगारांच्या प्रश्नांवर सिएसटीपीएसच्या अधिका-यांशी वैठक, कंत्राटी कामगार 4 हजार तर स्थाईकामगार फक्त 2 हजार 700 कसे, उपस्थित केला प्रश्न

सि.एस.टि.पी.एस येथील विदयुत निर्मीतीच्या प्रक्रियेत कामगार हा सुध्दा एक प्रमुख घटक आहे. त्यामूळे त्यांच्या मागण्या प्रलंबीत न ठेवता निकाली काढत कामगारांना वेतनासह सन्मानही दिल्या गेला पाहिजे, अशा सुचना देत येथील कंत्राटी कामगारांना लागू करण्यात आलेली 20 टक्के वेतन वाढ एका महिण्याच्या आत दया असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सि.एस.टि.पी.एस प्रबंधकाला दिले आहे. तसेच अस्थायी कामगारांची संख्या 4 हजार तर स्थायी स्वरुपात काम करणा-या कामगारांची संख्या केवळ 2 हजार 700 ईतकी कमी कशी असा प्रश्न ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.
सिएसटीपीएस येथील कामगांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिकारी व कंत्राटदारांची संयुक्त बैठक घेतली. हिराई विश्रामगृह येथे आयोजीत या बैठकीला सिएसटीपीएसचे मूख्य अभियंता राजू घूगे, उपमूख्य अभियंता ओसवाल, कल्याण अधिकारी वाघमारे, कार्यकारी अभियंता भेंडेकर, अधिक्षक अभियंता जाधव, वानखेडे, सहाय्यक कामगार आयुक्त आदिंची उपस्थिती होती. तर यावेळी कंत्राटदारांपैकी जाॅर्ज, कुट्टी, राॅय मित्तल यांच्यासह ईतर कंत्राटदार उपस्थित होते.
चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत कंेद्रा अतंर्गत अनेक कंपण्या कार्यरत आहेत. या कंपण्यांमध्ये कंत्राटी पध्दतीवर काम करण्या-या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. येथील कामगारांना योग्य वागणूक दिल्या जात नाही. वारंवार गेट पास परत घेतल्या जात असल्याच्याही कामगारांच्या तक्रारी आहेत. हे योग्य नसल्याचे या बैठकीत बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले. येथील निविदा प्रक्रियेतील दिरंगाईमूळे कामगारांना नियमित काम दिल्या जात नव्हते यावर आमदार जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त करत या प्रक्रियेत दिरंगाई होता कामा नये असं सांगीतले त्यानुसार पूढील महिण्यापासून ही प्रक्रिया तत्काळ केली जाणार असून येथील कामगारांना नियमीत काम दिल्या जाणार आहे. 10 तारखेच्या आत कंत्राटी कामगारांचे वेतन अदा करण्यात यावे तसे न झाल्यास संबधीतांवर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएस प्रबंधकाला दिले, कामगारांच्या भविष्य निवार्ह निधी संभदर्भातील संभ्रम दुर करण्यासाठी याची चौकशी करण्यात यावी, कामगारांना आठ तासांच्यावर काम दिल्या जाऊ नये, सर्व कामगारांना कौशल्या नूसार वेतन देण्यात यावे, समान काम समान वेतन देण्यात यावे, कौशल्या नुसार एरियस व इतर भत्ते देण्यात यावे, शक्ती इंटर प्रायजेसमध्ये काम करणा-या कामगारांना नियमीत काम देण्यात यावे, असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले, तसेच वाॅटर ट्रिटमेंट प्लांट मधील कामगारांचे काम मागील काही महिण्यांपासून बंद होते. मात्र आता आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्देशानंतर पूढील महिण्यापासून हे काम नियमीत सुरु होणार आहे. या कंपणीत कुशल कामगारांना अर्धकुशल किंवा अकुशल कामागार म्हणून गट अखणी केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत त्याकरीता किती कामगार कुशल, अर्धकुशल व अकुशल स्वरुपात काम करतात याची माहिती घेत योग्य वर्गवारी करण्यात यावी अशा सूचनाही या बैठकीला उपस्थित सहायक कामगार आयुक्त यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. या बैठकीला यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे हेरमन जोसेफ, प्रकाश पडाल, यांची तर यंग चांदा ब्रिगेडच्या विश्वजीत शाहा, विलास सोमलवार, राशिद हुसेन, नकूल वासमवार, गौरव जोरगेवार आदिंची उपस्थिती होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here