मार्कंडादेव पर्यटन स्थळाचा विकास प्रथम प्राधान्याने होणार
केंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री मा. प्रल्हादसिंह पटेल यांचे खास. अशोक नेते यांना आश्वासन
मार्कंडादेव पर्यटनाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याची खास . अशोक नेते साहेब यांची मागणी
गडचिरोली जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध तसेच विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव तीर्थक्षेत्रचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व येथे येणाऱ्या भाविकांना उपयुक्त सोयी- सुविधा निर्माण करण्यासाठी या देवस्थानाला केंद्रिय पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 10 मार्च रोजी महाशिवरात्री च्या शुभ पर्वावर केंद्रीय सांस्कृतिक कार्य तथा पर्यटन राज्यमंत्री मा. श्री प्रल्हादसिह पटेल जी ( स्वतंत्र प्रभार) यांच्याकडे केली या भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी मार्कंडा देवस्थान या तिर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी लवकरच निधी मंजूर करून या स्थळाला प्रथम प्राधान्याने विकसित करून या स्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्याचे आश्वासन खासदार अशोक नेते यांना दिले. तसेच यावेळी पुढील तात्काळ कारवाईकरिता प्रशासनास तसे निर्देशही दिले. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव हे तीर्थक्षेत्र लाखों भाविकांचे श्रध्दास्थान आहे येथे वर्षभर भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात मात्र याठिकाणी राहण्यासाठी आवासांची व्यवस्था, शुध्द पिण्याचे पाणी, शौचालय, सांस्कृतिक भवन, भक्त निवास व रस्त्यांची पुरेशी सुविधा नसल्याने येणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे सोयी सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे मा. मंत्री महोदयांशी चर्चा करतांना खासदार अशोक नेते म्हणाले, वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या या ऐतिहासिक पुरातन हेमांडपंथी मंदिरात दर्शनासाठी महाशिवरात्रीला 15 ते 20 लाख भाविक येत असतात. मात्र सोयी-सुविधाचा अभाव असल्याने भाविक- भक्तांची गैरसोय होते. आदिवासी बाहुल्य क्षेत्रातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मार्कंडा देवस्थान ला केंद्रीय पर्यटन च्या सूचित समाविष्ट करून या स्थळाचे सौदर्यीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करून ये- जा करण्यासाठी पक्के रस्ते, भाविकांना थांबण्यासाठी धर्मशाळा, भक्त निवास, सांस्कृतिक भवन, विश्रामगृहाचे बांधकाम, तसेच शौचालय बांधकाम व शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा निर्माण करण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मा श्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे केली तसेच वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र परिसरात उद्यान व बगीचांची निर्मिती केल्यास येथे पर्यटनास वाव असल्याचे ही यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले.