जागतिक महिला दिनी वैदर्भिय कवयित्री स्मिता बांडगे गाैरव पुरस्काराने सन्मानित ! 🔴🟣🔴🟠मूल(चंद्रपूर)🟣किरण घाटे🟠🟣 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजकीय सामाजिक शैक्षणिक ,साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणांऱ्या स्त्रियांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांच्या कार्याची दखल घेणे हा उदात्त हेतू समोर ठेऊन नगरपरिषद मूल येथील नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी विशेष सन्मान पुरस्कार हा उपक्रम सुरू केला आहे .या उपक्रमा अंतर्गत मूल येथील सुपरिचित कवयित्री स्मिता धनराज बांडगे यांची साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य म्हणून निवड करून गौरव पुरस्काराने त्यांना दि. ८मार्चला सन्मानीत केले. माझे गाव माझे भूषण असे आपण नेहमीच म्हणत असतो .घरातील व्यक्तीची जशी कुटुंब प्रमुखाने दखल घ्यावी त्याचप्रमाणे रत्नमाला भाेयर यांनी मला सन्मानित केले असे मुलच्या सुपरिचित ज्येष्ठ कवियित्री स्मिता धनराज बांडगे ह्या या कार्यक्रमात बाेलतांना म्हणाल्या .कार्यक्रमाला शहरातील महिलांची उपस्थिती उल्लेखनिय हाेती .स्मिता बांडगे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या एक जेष्ठ मार्गदर्शिका आहे .हे विशेष !