कोरोनाच्या संकटामुळे कुलथा यात्रा महोत्सव रद्द
गोंडपिपरी(सूरज माडूरवार)
कुलथा येथील हनुमान मंदिर सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून गोंडपीपरी तालुक्यात ओळखले जाते.हजारो भक्त दरवर्षी शिवरात्री आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी करतातं. येथे मोठी जत्राही भरते.अंधारी व वैनगंगा या दोन नद्यांच्या मधोमध वसलेले हे गाव आहे.हनुमांनजि यांची मूर्ती असून जागृत मानल्या जाते. त्यामुळे येथे हजारो भाविक दरवर्षी येतात.सदर यात्रेचे आयोजन ११ मार्च ला करण्यात आले होते.मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक कार्यक्रम व यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष कृष्णा पिदूरकर,खेत्री देवाडे, बंडू फोपरे यांनी दिली आहे.यात्रा महोत्सव रद्द झाला असून गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त असनार नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी माहिती ठाणेदार संदीप धोबे, पीएसआय धर्मराज पटले यांनी दिली आहे.