शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार
🔴🟢चंद्रपूर🟢🔴किरण घाटे🟢
विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांसाठी विविध योजना राबत या घटकांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसकंल्प असल्याची प्रतिक्रीया चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व घटकांना समान न्याय देत विविध योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शरद पवार कृषी योजना सुरु करण्यात आली असून या अंतर्गत 501 भाजीपाला, रोपवाटीका तयार करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास योजनेचाही या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. सुंदर माझे कार्यालय या योजने अंतर्गत चंद्रपूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला 51 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या अंर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मार्कन्डा देवस्थानाच्या विकासाठीही मोठ्या निधीची तरतूत या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृह स्वामीनी योजनाही सुरु करण्यात येणार असून यासाठी मोठ्या निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. घरापासून शाळेपर्यत जाण्यासाठी मुलींना प्रवास मोफत करण्याचा एतिहासीक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. पर्यटनाला चालना मिळण्यासाठीही या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीतच समाजातील महत्वाच्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी दिली आहे.