राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत बनलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे!
अमोल राऊत, राजुरा/कढोली (बूज.) : राजुरा तालुक्यातील कढोली (बूज) गावातील ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत पाण्याचा टाकीचे बांधकाम करण्यात आले. पंरतु ते काम पाहता नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
मुख्य म्हणजे टाकी वरती बांधले ले घेर लोखंडी रॉड असायला हवे होते मात्र त्याठिकाणी प्लास्टिक चे पाईप लावण्यात आले आहे.
सोबतच टाकी वरती जाण्यासाठी लोखंडी सीडी लावण्यात आल्या आहे. मात्र या सीडी कुठल्याही काँकरेट पिलर मध्ये सामावून घेतल्या गेली नाही. त्या सिड्या पूर्णपणे मोकड्या करून ठेवण्यात आल्या आहेत. पाण्याच्या टाकी खाली कोणत्याच प्रकारचे कंपाउंड देखील घेण्यात आलेले नाही. सोबतच त्या बांधकामाला प्लास्टर देखील नाही. बांधकामासाठी वापरण्यात आलेले लोह्याचे रॉड दिसून येत आहे.
ह्या सर्व बाबी पाहता नवं-निर्वाचित सरपंच राकेश हिंगाणे यांनी बांधकामा संबंधित ठेकेदार – भट्टड व अ. ल. कोटनाके शाखा अभियंता पाणी पुरवठा विभाग पं.स राजुरा यांना जाब विचारला असता त्यांनी सरपंच यांना उत्तर दिले की आमच्या कडे यातील कुठली ही माहिती उपलब्ध नाही. शेवटी त्यांनी असे सांगितले की, आम्ही पाण्याच्या टाकीला सीडी लावून देऊ. सीडी अगोदरच लागलेली आहे आणि ती सीडी योग्य रीती ने बसवण्यात आलेली नाही. त्या सीडीने वरती जाताना सफाई कामगार किंवा मौका तपासणी यांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच ह्या सर्व कामाकरिता गावात पाणीपुरवठा समितीची नेमणूक केली गेली होती. परंतु त्यांनी योग्य ती कामगिरी बजावली नाही हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. पाणीपुरवठा समितीने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार न पाडल्याचा गावातील जनता आरोप करत असून स्थानिक जनतेत याबाबत आक्रोश पहावयास मिळत आहे. ह्या सर्व प्रकरणाची तपासणी करून यातील घोडेबाजार कारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नुकताच उन्हाळा सुरू होत आहे. आणि अशा परिस्थिती मध्ये गावकऱ्यांना पाण्याची खूप आवश्यकता असुन सुद्धा संबंधित अधिकारी, ठेकेदार व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांच्या भोंगळ कारभारामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.