अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
जिल्हा वर्धा
मुद्रा लोन पंतप्रधान योजनेच्या नावाखाली लंका लूट करणाऱ्या विजन ऑफ लाइफ फाउंडेशनची सर्वकष चौकशी करून कारवाई करा-माजी आमदार.प्रा राजू तिमांडे
महाराष्ट्रातील लोकांकडून पैशाची लंका लूट करणाऱ्या विजन ऑफ लाइफ फाउंडेशनची सखोल चौकशी करा.
महाराष्ट्रातील लोकांना विदेशी बँकेचे खोटे चेक देऊन केली फसवणूक.
हिंगणघाट:- ०६ फरवरी २०२१
मुद्रा लोन पंतप्रधान योजनेच्या नावाखाली ‘विदेशी बँकेचा’ खोटा धनादेश देऊन लोकांकडून पैशाची लूट करणाऱ्या हिंगणघाट जि वर्धा येथील प्रकरणाची सर्वकष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
मुद्रा लोन पंतप्रधान योजनेच्या नावाखाली ‘विजन ऑफ लाइफ फाउंडेशनच्या’ वतीने हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील नांदुरी रोडवर भाकऱ्या नाल्याजवळ महाकाली नगरीमध्ये भव्य पेंडॉल उभारून विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लोकांकडून पैशाची लंकालूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका एनजीओची बनवेगिरी पोलिसांनी उघड केली आहे.
सविस्तर असे की पंतप्रधान मुद्रा योजनेच्या नावाखाली प्रत्येकाला पाच लाख रुपये कर्ज देत असल्याची योजना सांगून हिंगणघाट मध्ये भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातून चार ते पाच हजार लाभार्थी हजर झाले होते.
हिंगणघाट शहरातील नंदोरी रोडवर भाकरा नाल्याच्या बाजूला महाकाली नगर येथे वसाहतीत दिनांक ०५ फरवरी २०२१ ला सकाळी चेक द्वारे लोन वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. विजन ऑफ लाईफ नावाच्या संस्थेमार्फत हा कर्ज वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भातील गाव खेळांमध्ये मध्यस्ती दलाल पाठवून त्या गावातील होतकरू बेरोजगार युवकांकडून नोकरीवर लावून देण्याचे खोटे सांगून मासिक वेतन सुरू करून अनेकांकडून कर्जाच्या नावावर शंभर रुपयांच्या स्टॅम्प फॉर्मवर करार करून घेतल्याची माहिती मिळाली आहे.
या करारानुसार पाच लाख रुपये व एक लाख रुपये कर्ज देण्याचे प्रपोजल तयार करण्यात आले. पाच लाख रुपयांचे कर्जासाठी तीन कोरे स्वाक्षरी केलेले चेक घेण्यात आले. स्थानिक महाकाली नगरी मध्ये कर्ज वाटपाचा कार्यक्रमात पाच लाख रुपयांची तर अनेकांना एक लाख रुपयांचे चेक देण्यात आले. त्यावेळी १०,२५० रुपया प्रमाणे पैसे घेतल्या गेले अनेकांना चेक देण्यात आले पण त्यांनी बँकत चेक जमा केले असता त्या चेकवर इंडोनेशिया चा पत्ता आहे. त्यामुळे हे सर्वच एक बोगस असल्याचे निदर्शनात आल्यानंतर या कर्जवाटपाचा लाभ घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून आठ लाभार्थी येथे आले होते त्यांनी 1 महिन्यापूर्वी नागपूरला कर्ज मागणीचे फॉर्म भरले होते. सिंदखेड राजा येथील लाभार्थ्यांना तुमचे कर्ज मंजूर झालेले आहे तुम्ही हिंगणघाट येथे कर्जवाटप मेळाव्यात येऊन १० हजार २५० रुपये जमा करून आपले धनादेश घेऊन जा असे सांगण्यात आले. सिंदखेडराजा येथील लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे जाऊन कळविले त्यानंतर पोलिसांना लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
तरी हजारो लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विजन ऑफ लाईफ फाउंडेशन च्या कथित रॅकेट प्रकरणी सर्वकष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना केली आहे.