लिखितवाड्याच्या टेकोडा घाटावरून रेतीचोरी जोमात
गोंडपिपरी(सूरज माडूरवार)
लिखितडाडा भीमनी च्या मधोमधात वाहणाऱ्या टेकोडा घाटातून रेती तस्करीला उधाण आले असून रेती चोरीचा गोरखधंदा सुरू असून आतापर्यंत अंदाजे २ हजार ब्रास रेती तस्करांनी बेधडक पणे नेली व तस्करी सुरू असल्याने परिसरातील रेती तस्करांसाठी हा घाट वरदान ठरत आहे.
महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे.एखाद्या गावात जायला पक्का रस्ता नसतो मात्र या नदिघाटात एकाच वेळी १० हायवा लागेल असा रस्ता तस्करांनी निर्माण केला आहे.चंद्रपूर जिल्हात लिखितवाडा( टेकोडा) येथील रेतीला उत्तम मागणी असून सर्वात बारीक रेती या ठिकाणी आहे.विशेष म्हणजे टेकोडा घाट विकत घेतला आहे या तोऱ्यात नदीपात्रात पोकलँड जेसीबी सह रोज १० हायवा टाकत असल्याची चर्चा परिसरात आहे.स्थानिक गावकऱ्यांना जनावरे पाणी पाजण्यासाठी नेताना खोल खड्डे असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.उन्हाळा सुरू झाला असून नदी-नाले सर्वत्र आटले असून जिथे पाणी आहे तिथे खोल खड्डे असल्याने जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.जागोजागी उपसा केल्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात खोलवर जात आहे.भविष्यात जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून वेळीच तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.