मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर व जी. प. शाळा नांदगाव, ग्रामपंचायत नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा बाह्य विद्यार्थी जनजागृती रॅली
मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर, जिल्ह्यातील निवळक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे, मॅजिक बस च्या माध्यमातून 12 ते 16 वयोगटातील विद्यार्त्यांसाठी खेळाच्या माध्यमातून, शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम स्केल (SCALE) कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील 2554 विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रम राबवित आहे.
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार 1 ते 10 मार्च 2021 पर्यंत गावातील प्रत्येक मूल-मुली शाळाबाह्य राहू नये या साठी शाळा बाह्य विद्यार्थी नोंदणी चालविण्यात येत आहे.
आजपासून गावस्तरावर शाळाबाह्य बालक विशेष शोध मोहीम बाबत सर्वेक्षण सुरू झाले आहे.
त्या अनुषंगाने सर्वांनी आपले अधिनस्त/दत्तक शाळा बाह्य विद्यार्थी माहिती व त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वया नुसार शाळेत प्रवेश करून घेणे हा उद्देश गावा गावात पोचवून जंनजागृती करणे आहे.
या अनुषंगाने मॅजिक बस चंद्रपूर, जी. प. शाळा नांदगाव,ग्रामपंचायत नांदगाव,आशा, उषा, अंगणवाडी कर्मचारी मिळुन जनजागृती रॅली नांदगाव येथे काढण्यात आली
या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम.सदष्य, शाळा व्यवस्थापन समिती,शाळेतील सर्व शिक्षकवृंद, आशा उषा अंगणवाडी सेविका शिक्षण विभाग आरोग्य विभाग आदी उपस्थित होते
हा कार्यक्रम मॅजिक बस चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे, तालुका समन्वयक मा.मनोज टप यांच्या निदर्शनात आयोजित करण्यात आला तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मॅजिक बस चे नांदगाव गावातील समुदाय संघटक यांनी प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी झाला.