चंद्रपूर नगरीतील रामाळा तलावाचे जतन झाले पाहिजे उस्मानाबादचा सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारेची मागणी ! 🟡🟣🔴🟤उस्मानबाद🔵🟢🟠🔶🔶🔶किरण घाटे🟢🔶🔴
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला रामाळा तलाव हा 500 वर्षेपुर्वीचा गोंड कालिन तलाव आहे, सदरहु तलाव अतिक्रमण,प्रदुर्षण,यापासुन वेढला आहे, इको प्रोने तलाव या सर्व समस्यां बाबींपासून मुक्त व्हावा या करीता सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही म्हणुन दि.22 फेब्रुवारी 2021पासुन इको प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी अन्नत्याग सत्याग्रह अवलंबिले आहे.🟢🔶🔴🟣🟡🟤🟠🔴🟣🟢🔶संरक्षक भिंत,रेल्वे मालगाडीतुन वाहतूक होणारे रासायनिक खते व बियाणे यांचे मिश्रीत पावसाळ्यातील पाणी, तलावातील जलप्रदूषण पाण्यामुळे मासे मृत होत असुन या परिसरातील भुजल देखिल प्रदुर्षणयुक्त होत आहे.🟢🔶🔴🟣🟠🟡🟤🔵🟢🔴🔶सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे अतिक्रमण, खोलीकरण,सौदर्यकरण व इतर अन्य ब बाबींसाठी हे आंदोलन चालू असुन आपण याकडे गांभीर्याने लक्ष वेधुन अन्नत्याग सत्याग्रह करणारे इको प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांना या आंदोलनापासून परावृत्त करावे,इको प्रोचे हे आंदोलन न्याय हितकारक आहे .त्यांना त्वरीत न्याय द्यावा अशी मागणी एका लेखी निवेदनातुन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्फत व ई-मेल द्वारे चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि पर्यावरण राज्यमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केली आहे.
Home Breaking News चंद्रपूर नगरीतील रामाळा तलावाचे जतन झाले पाहिजे उस्मानाबादचा सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारेची...