महापौरांसह भाजपच्या शिष्टमंडळाची अन्नत्याग सत्याग्रहाला भेट
पाचव्या दिवशी पाच महिलांनी केले साखळी उपोषण
चंद्रपूर/ प्रतिनिधी । रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील ५ महिलांनी आज शुक्रवारी (दि. २६) उपोषण केले. चंद्रपूरचे महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन मागण्यांवर चर्चा केली. उपोषणाचा पाचवा दिवस होता. आजच्या साखळी उपोषणात नेत्रा इंगुलवार, जास्मीन शेख, भारती शिंदे, योजना धोत्रे, अंजली अङगुरवार यांनी सहभाग घेतला.
चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावङे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ङाॅ. मंगेश गुलवाङे, स्थायी समिती अध्यक्ष रवि आसवाणी, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, नगरसेव सुभाष कासनगोटुवार, माजी उपमहापौर संदीप आवारी यांनी भेट देऊन इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्याशी चर्चा केली.
दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. विदर्भ राज्य आघाङीचे नीरज खांदेवाले, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एल. आय. सरबेरे, सचिव डॉ. विजय भंडारी आणि कोषाध्यक्ष डॉ. अमित कोसुरकर, फीमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एड. विजय मोगरे, एमायडिसी इंडस्ट्रीज असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्श दात्री समितीचे प्रतिनिधी दामोदर मंत्री, श्री महर्षी विद्या मंदिरच्या प्राचार्य श्री लक्ष्मी मुर्ती, संजीवन पर्यावरण संस्था मूलचे अध्यक्ष उमेशसिंग झिरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखेचे अध्यक्ष भरत गुप्ता, शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, जमाअत ए इस्लामी हिंद चंद्रपूरचे शहराध्यक्ष मुन्तजिर अहमद खान, एलिमेंट चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे पदाधिकारी एकता विकलांग शक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रदीप लांडगे ग्राम विकास कृती समिती विसापूर चे योगेश निपुंगे, डॉ. प्रा. पदमरेखा दीक्षित, नवी मुंबईतील विवेक दीक्षित, शीव दिक्षित, मुकेश भांदककर, साई राम टॉवर्स असोसिएशन; चंद्रपुर श्रीराम वार्डचे पदाधिकारी, गुड मॉर्निंग क्लब चंद्रपूरचे पदाधिकारी, मावळा सायकल ग्रुप चंद्रपूर यांचा समावेश होता.