इको-प्रोच्या अन्नत्याग आंदोलनाला आमदार जोरगेवारांची भेट !
🟡🟢🟣🟠चंद्रपूर🟠🟢🟣किरण घाटे🟠🟡🟢🔶
🟢🟠🟡🟣🔶🔵🟣🟡🟤🔴ऐतीहासीक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी सुरु असलेल्या इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली. 🟣🟡🟠🟢🔴🔴🔶🟤🟤🔵यावेळी आ. जोरगेवार यांनी आंदोलकर्त्याशी चर्चा करुन त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा केली.🟤🔵🔴🟡🟣🔶🔶🟢🟠यंग चांदा ब्रिगेडचे अजय जयस्वाल, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, पंकज गुप्ता, हरमन जोसेफ आदिंची उपस्थिती होती.
🔵🔶🟠🟢🟤🔴🔴🔴🟣🟣शहरातील गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला रामाळा तलाव आज अतिक्रमणाने गिळंकृत होत आहे. तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामूळे रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी इको-प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आले आहे. 🟣🔴🔶🟤🟤🟢🟢🟠🟠🔵दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर आंदोलनाला भेट दिली. यावेळी आमदार जोरगेवार यांनी आंदोलकर्त्याच्या मागण्या जाणून घेत त्याबाबत सविस्तर चर्चा केली. रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी या मागण्या रास्त असल्याचेही यावेळी ते म्हणाले या मागण्या सोडविल्या जाव्हात यासाठी पाठपूरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क साधत सदर आंदोलनातील मागण्यांबाबत माहिती देत चर्चा केली. 🔵🟠🟢🟢🟤🔴🟣🔶🟡🟠रामाळा तलाव चंद्रपूरच्या नैसर्गीक सौदर्यात भर घालण्याचे काम करत असून अशा वास्तुंचे जतन होणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.