तृतीय पंथींना जीवनावश्यक उपाय योजना उपलब्ध करून द्या ! सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारे यांची मागणी !
🟥🌼🟫उस्मानाबाद🟪🟫🔲⬜ ♦️🟥किरण घाटे🟫⬜🔲🟪 तृतीय पंथी हा घटक जीवनात अत्यंत हाल अपेष्टांना तोंड देत जगत आहे, आजही शासनाच्या योजनेपासून ते वंचित आहेत, सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशन व अन्य ठिकाणी भिक्षा मागून उपजिविका भागवितात,यांना कायमस्वरूपी असे जगण्याचे काेणतेती साधन नाही, यांचा कायमस्वरूपी पोटापाण्यांचा प्रश्न मिटविण्यासाठी त्यांना समाज कल्याण विभागाकडून दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेतुन पाच एकर जमीन द्यावी,सर्व शिक्षण अभियानांतर्गत शिक्षण द्यावे,आवास योजनेतील लाभ,यांचा सर्व्हे करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करावे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात यांची संख्या लक्षात येईल व त्यांना मदत पोहचेल.🟥♦️🟪🟫🔲♦️🟥🟫⬜ शासनाचे जे काही अधिकार यांना आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे .या सर्व वरिल बाबी त्यांच्यासाठी लाभदायक ठरतील .जमीन त्यांना मिळाल्यास ती कसुन उपजिविका भागवितील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या कडे एका लेखी निवेदनातुन काल मंगलवार दि.२३फेब्रुवारीला केली आहे.