प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई व ठाणे कार्यालयाचे शानदार उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे मुंबई व ठाणे मुख्य कार्यालयचे उद्घाटन संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या हस्ते शानदार रितीने करण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख, मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड अमोल सकट, राज्य चित्रपट प्रमुख दिग्दर्शक प्रशांत विलनकर, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य युवा प्रदेश कार्याध्यक्ष प्रशांत विलनकर, कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार, ठाणे जिल्हाध्यक्ष किरण पडवळ, मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन यादव, महेश कदम, पालघर जिल्हाध्यक्ष राजेश संखे, मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल, ठाणे जिल्हा युवा महिलाध्यक्षा ज्योती अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर प्रथम ठाणे कार्यालयाचे उद्घाटन व तद्नंतर मुंबई कार्यालयाचे उद्घाटन करून सहविचार सभा व नियुक्ती पत्र प्रदान समारंभ पार पडला. याप्रसंगी उद्घाटक डी.टी.आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रात करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याचा आलेख सादर केला. संघाचे उद्देश व त्या उद्देशपूर्तीसाठी संघ कोणत्या पद्धतीने कार्य करीत आहे याची माहिती दिली. संपादक व पत्रकारांना कोणतीही अडचण वा समस्या निर्माण झाली तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सदर पत्रकारांच्या मदतीला तात्काळ धावून जातो, पत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही असा विश्वास यावेळी देण्यात आला. अध्यक्षस्थानावरून रमेश मोपकर यांनी संघाचे कार्य कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचल्याने पत्रकार मोठ्या संख्येने या संघात सहभागी होत असल्याचे नमूद केले, राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख यांनी संघातील पत्रकारांचे आरोग्य निरोगी कसे राहील यासाठी आम्ही महाराष्ट्रभर मोहिम राबवणार असून त्याची सुरुवात मुंबईतून होणार असल्याचे स्पष्ट केले, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी संघाच्या वाढत्या व्याप्तीबद्दल सखोल मार्गदर्शन केले तर कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी ग्रामीण भागापासून अनेक तालुके व शहरात संघ कसा पोहोचतोय याबद्दल विवेचन केले. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले तसेच पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन व आभार युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरु यांनी केले. याप्रसंगी संघाचे रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा आशा सुरते, पनवेल तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, सांताक्रुझ अध्यक्ष संतोष येरम, कल्याण तालुका महिलाध्यक्षा रमा गवळी, बोरीवली तालुका महिलाध्यक्षा वर्षा इंदूलकर, पत्रकार शरद पवार, दिनेश पवार, पत्रकार पंकज पोतदार आदी पदाधिकारी, पत्रकार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.