चंद्रपूरची ओळख पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देणारा जिल्हा व्हावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

0
685

चंद्रपूरची ओळख पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देणारा जिल्हा व्हावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

भद्रावती परिक्षेत्रातील चोरा – तिरवंजा सफारी पर्यटन रस्त्याचे उदघाटन

चंद्रपूर : जिल्ह्यातील गर्द जंगल आणि विपुल प्राणिविश्व अनुभवण्याची संधी वनविभागाने दिली आहे. त्यामुळे आता भद्रावती परिक्षेत्रातील चोरा – तिरवंजा या ठिकाणी जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. या माध्यमांतून पर्यटनातुन स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे. येत्या काळात चंद्रपूरची ओळख प्रदूषित व उद्योग धंद्याकरिताच न राहता पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देणारा जिल्हा अशी व्हावी असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या भद्रावती परिक्षेत्रातील चोरा – तिरवंजा सफारी पर्यटन रस्त्याच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्य वनसंरक्षक एन, आर. प्रवीण, विभागीय वन अधिकारी सारिका जगताप, विभागीय वन अधिकारी धोत्रे, तहसीलदार शिंतोडे, जिल्हा प्ररिषद सदस्य मारोती गायकवाड, सह वनरक्षक लखमावर, संकलन अधिकारी चोपडे, पंचायत समिती सदस्य महेश टोंगे, सरपंच चोरा संगीताताई खिरटकर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास, वन परिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड, अनिल बावणे यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण जगात ताडोबा अभयारण्याच्या माध्यमातून आहे. त्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक नागरिकांना हाताला काम मिळत असते. त्याच प्रमाणे या सफारीच्या माध्यमातून देखील या परिसरातील नागरिकांना व विशेषतः युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे. या माध्यमातून वनविभागाने आणखी जिल्ह्यात अशाच प्रकारे पर्यटनाला चालना देण्याकरिता नवनवीन उपक्रम राबवावे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here