गोंडपिपरी ग्रामिन रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव
आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची मागणी
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
ग्रामिण रुग्णालय गोंडपिपरी येथे वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गोडपिपरी तालुका हा आदिवासी बहुल भाग असून तालुक्यात ९८ गावांचा समावेश आहे.खेडयापाड्यातील नागरील मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात येतात. परंतु ग्रामिण रुग्णालयात महिला वैधकीय अधिकारी तसेच सोनोग्राफी सेंटर नसल्यामुळे गर्भवती व इतर महिलांची तपासणी व उपचार होऊ शकत नाही.त्यामुळे महिलांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.सोबतच उच्च स्तरीय शस्त्रक्रियागृह निर्माण करा अशी मागनी भाजपा महिला आघाडी तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली यावेळी.महिला आघाडी शहर अध्यक्ष अरुणा जांभूळकर,बबन निकोडे,निलेश संगमवार,नगरसेवक चेतनसिंह गौर,नगरसेक राकेश पुन,सुनील फुकट,प्रशांत येल्लेवार,साईनाथ मास्टे,प्रांजली बोंगीरवार,अनुजा बोंगिरवार,अश्विनी तोडासे,अस्मिता रापालवार,मनीषा मडावी यांची उपस्थिती होती.