आदर्श घाटकुळला आर.आर.पाटील जिल्हा सुंदर (स्मार्ट) गाव पुरस्कार प्रदान….
७० लाखाचा पुरस्कार गावकऱ्यांना सुपूर्त
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत राज्यात आदर्श ग्राम ठरलेल्या घाटकुळ ग्रामपंचायतीला आज आर.आर.पाटील जिल्हा स्मार्ट/सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राहूल कर्डीले सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्याम वाखर्डे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.कलोडे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. घाटकुळच्या मा.सरपंच प्रिती मेदाळे, ग्रामसेवक ममता बक्षी, मा.ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, स्वेच्छाग्रही राम चौधरी, संगणक चालक आकाश देठे, रोजगार सेवक वामन कुद्रपवार, कर्मचारी अनिल हासे, उत्तम देशमुख, ग्रामसंघ अध्यक्ष देठे यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत घाटकुळ गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून दोन वर्ष काम करता आले, याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे. यादरम्यान गाव राज्यात आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त ठरले. स्वत: पद्मश्री पोपटराव पवारांनी गावाला येवून परिक्षण केले. ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, हरित व स्वच्छ ग्राम पुरस्कार व आता ७० लाखाचा तालुका व जिल्हा आर.आर.पाटील स्मार्ट/सुंदर गाव पुरस्कार देखील गावाला मिळाला. नाविण्यपूर्ण उपक्रम व लोकसहभाने गावाच्या विकासाचा चढता आलेख जिल्हा व राज्यात दिशादर्शक ठरला.
घाटकुळ अल्पावधीतच जिल्हा व राज्यात दखलपात्र ठरले. गावक-यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे हे फळ आहे. गावासाठी दिवस रात्र खपणा-या हातांचे मनापासून अभिनंदन. मार्गदर्शन करणारे सर्व अधिकारी वर्गाचे आभार. घाटकुळची वाटचाल नेहमीसाठी समृद्ध, दिशादर्शक व आदर्श रहावी, आता देशपातळीवर सकारात्मक प्रयत्नातून दखलपात्र ठरावे या करिता गावकऱ्यांना अविनाश पॉईंनकर यांनी शुभेच्छा दिल्यात.