गोंडपिपरी तालुक्याचा भूमिपुत्र कृष्णा गोंगलेनी जिद्दीने मिळवले यश
वाहन चालक ते पीएसआय प्रवास प्रेरणादायी
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
वडिलांची व आईची ताटातूट त्यामुळे आईने व वडिलांनी एक एकटे मांडलेली वेगळी चूल.घरात अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही कृष्णा कालिदास गोंगले यांनी परिश्रमातून पोलीस विभागात १० वर्ष वाहन चालक तर आता नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र ठरलेला प्रवास प्रेरणादायी आहे.
कृष्णा चे प्राथमिक शिक्षण गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील जी.प शाळेत झाले.दुसरीत असताना वडील व्यसनेच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबात वाद व्हायचे आई व वडील वेग वेगळे संसार थाटण्याचा निर्णय घेतला.आईने माहेर गाठला व वडील व्यसनेच्या आहारी अशा स्थितीत कस बसे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर बहिणीचे लग्न झाले भाऊजी पोलीस विभागात असल्यामुळे त्यांच्याकडेच राहून पुढील शिक्षण गडचिरोली, भामरागड, नागपूर ला झाले.आई वडिलांपासून लहान पणापासून दूर राहून प्रचंड मेहनत करून पोलीस विभागात भर्तीत सहभाग घेतला व २०१० च्या भर्तीत पात्र ठरला .त्यानंतर नोकरी सोबत पदवीधर शिक्षण घेतले.सोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.१० वर्ष पोलीस विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत होते.नुकत्याच १० फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला व पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागला त्यात खुल्या प्रवर्गातून कृष्णा ची निवड झाली.आणि त्याच्या मेहनतीला यश प्राप्त झाले.त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून यशाचे श्रेय बहीण, भाऊजी प्रकाश सोनटक्के ,आई वडिल,मुलगी,पत्नीला दिले आहे.
कष्ट व त्याग डोळ्यांपुढे होता.वाहन चालक ते पोलीस उपनिरीक्षक प्रवास हा आव्हानात्मक होता.मनात आत्मविश्वास व जिद्द असल्यामुळे अवघड न्हवता.
-कृष्णा गोंगले.