सरपंचपदी विजय निखाडे तर उपसरपंचपदी किरण थेरे
दुसऱ्यांदा जैतापूर-नांदगाव गट ग्रामपंचयातीवर आदर्श ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व
राजुरा : कोरपना-राजुरा तालुक्याच्या सिमेवर असलेल्या जैतापूर-नांदगाव गट ग्रामपंचयातीवर आदर्श ग्रामविकास आघाडीचे विजय निखाडे यांची सरपंचपदी तर किरण प्रवीण थेरे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या जैतापूर-नांदगाव (सुर्या) ग्रामपंचायतीमध्ये भाजपा, शेतकरी संघटना समर्थीत आदर्श ग्रामविकास आघाडीकडे जनतेनी बहुमत देत मागील पंचवार्षिक प्रमाणे यावर्षीही सरपंचपद व उपसरपंच पद जनतेनी बहाल केली आहे. रोज शुक्रवारला (दि. १२) झालेल्या निवडणुकीत सरपंच व उपसरपंच पदाकरीत कांग्रेसकडून प्रवीण टिपले उपसरपंच पदाकरिता निर्मला चौधरी यांनी आवेदनपत्र सादर केले तर यांच्या विरोधात आदर्श ग्रामविकास आघाडीकडून सरपंच पदाकरिता विजय निखाडे उपसरपंच पदाकरिता किरण थेरे यांनी आवेदनपत्रे सादर केली. यात आदर्श ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांनी चार-पाच अशा फरकांनी विजय मिळवित मागील पंचवार्षिक प्रमाणे यावर्षीही सरपंच व उपसरपंच पद कायम राखण्यात यश मिळविले. यावेळी आदर्श ग्रामविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश बेरड, शामसुंदर कोलांडे, नलिनी चौधरी यांनी सरपंच व उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरपना तहसिल कार्यालय येथील अन्न पुरवठा निरीक्षक राजेश माकोडे यांनी काम पाहिले. निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंच यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर, सुधाकर गोरे, मदन सातपुते, सुनील खारकर, रवी गोखरे, संतोष पोडे, निखिल तुरानकर, अशोक खुसपुरे, अंकुश चिने, संजय चौधरी, बापूराव ताजणे, वसंता गोनेवार, शंकर गोरे, स्वराज ताजणे, शाहींद्र मडावी, भास्कर फोफरे, गणपत मडावी, प्रफुल थेरे, भाऊराव हनुमंते, हरीचंद्र फोफरे, प्रवीण थेरे, प्रदीप गोरे, सचिन देवगडे, दिवाकर बेरड, विकास पाहनपट्टे, अमोल बेरड, रवींद्र आत्राम, यशवंत मोरे, संतोष उरकुंडे, बबन ठाकरे, राहुल तुरानकर, राकेश ठेपाले, अशोक कुडे, कुंदन कोलांडे, विनोद निखाडे, स्नेहल बोबडे, सचिन लसंते, विलास कोलांडे, विकास पडाल, सुरज टिपले, लक्ष्मण थेरे, शंकर देठे, प्रफुल कातकर, कपिल लसंते आदींनी अभिनंदन केले.