विचारांची देवाण घेवाणही तेवढीच महत्वाची – आ. किशोर जोरगेवार
हळदी कुंकु कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणिय ! दरवर्षी हाेताेयं हा कार्यक्रम साजरा !
🟥🟩🟡चंद्रपूर🟡🟥🟩💠किरण घाटे💠🟡🔶🟧🟪
हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वाणांची देवाण घेवाण करतात मात्र महिलांच्या वैचारीक सक्षमीकरणासह समाज परिवर्तणासाठी या निमीत्याने का होईना वाणांसह विचारांचीही देवाण घेवाण गरजेची असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
💠🟡🟩🟪🟥🟧🔶🟣🟢यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आज शुक्रवारी हळदीकुंकू व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते
🟩🟣🔶🟧🛑🟥🟪🛑यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, हळदीकुंकू कार्यक्रम हा महिलांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करुन देणारा सण आहे. सहजा घरगुती होणारा या उत्सवाला आता सार्वजनीक स्वरुप प्राप्त झाले आहे. मात्र आपण जे सण साजरे करतो ते हौस म्हणून करतो की त्यामागील धार्मिक हेतू जाणून करतो याचाही विचार करण्याची गरज आहे केवळ धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी कुंकू नाही तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कलाकुसर दिसते तसेच वैचारिक बौद्धीक देवाणघेवाण होते. आणि हाच या आयोजनांमागचा मुळ उद्देशही असला पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले महिलांना हक्काचे योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी यंग चांदा बिग्रेड नेहमीच सामाजीक कार्यक्रमात अग्रस्थानी राहणारी संस्था आहे. महिलांच्या शब्दांची आता दखल घेतल्या जात आहे. त्यामूळे त्यांनी अशा आयोजनातून अन्यायाविरोधात व्यक्त होण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. 🟧🟡🛑🟢🟧💠💠🟪🟩🟣महिलांसाठी स्वतंत्र व्यायमशाळा सुरु करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदीकुंकु लावून वाण स्वरुपात भेट वस्तू देण्यात आल्या. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणिय हाेती . 🟥🛑🟣🔶🟧🟩🟪💠🟩दरवर्षी हा कार्यक्रम या सामाजिक संस्थेच्या वतीने थाटात साजरा हाेताे .🛑🟩🟡🟪🟧🔶💠🟣🟥आज पार पडलेल्या या कार्यक्रमाला यंग ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्या प्रामुख्याने हजर हाेत्या .