अवैध धंदे बंद करा पोलीस विभागाला राष्ट्रवादीचा इशारा नाही तर येत्या काही दिवसात करणार आंदोलन

0
772

अवैध धंदे बंद करा पोलीस विभागाला राष्ट्रवादीचा इशारा नाही तर येत्या काही दिवसात करणार आंदोलन

▶️गुंड प्रवृत्तीला पोलिसांचे पाठबळ, राकाँच्या “अरूण निमजें” चा स्पष्ट आरोप.

गडचांदूर/प्रवीण मेश्राम-

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे चिकन,मटण मार्केटमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूविक्री विरोधात त्याच वॉर्डातील महिलांनी २९ जानेवारीला हल्लाबोल करून दारू पकडून दिल्याचं वचपा काढण्याच्या उद्देशाने दारूविक्रेतांनी कोरपना राकाँ महिला तालुकाध्यक्षा रितीका ढवस यांच्या घरावर हल्ला चढवला होता.याची माहिती मिळताच जि.प.सदस्य शिवचंद्र काळे हे ढवस परिवाराचा बचावासाठी गेले असता त्यांना सुध्दा मारहाण करण्यात आली.झालेल्या हल्ल्याने संतप्त नागरिकांनी अंदाजे तीन तास रस्ता रोखून धरला होता.विविध कलमांखाली आरोपींना ताब्यात घेण्यात आले.रस्ता खुला करण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आग्रह केला मात्र आंदोलनकर्ते माघार घेण्यास तयार नव्हते. “जोपर्यंत अवैध दारूविक्री,सट्टापट्टी कायमची बंद करण्याचे आश्वासन पोलिसांकडून मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही” अशा भूमिकेत आंदोलनकर्ते होते.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी घटनास्थळी येऊन दारू विक्रेते व सट्टापट्टी व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला.
सदर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी अचानकपणे नांदा,गडचांदूर पोलीस स्टेशन येथे भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here