“वीज बिल” नोटीसांच्या निषेधार्थ आपचे बल्लारपुरात जन आंदोलन ; जनतेचा उत्स्फुर्त सहभाग
बल्लारपूर । किरण घाटे
आम आदमी पार्टी बल्हारपुर शहर तर्फे विज बिल विभागाद्वारे पाठवन्यात येत असलेल्या नोटीसांच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन जिल्हा विधी एड. किशोर पुसलवार रविकुमार पुप्पलवार, आसिफ भाई हुसेन शेख, नन्दकिशोर सिन्हा व अफ़ज़ल भाई अली यांच्या नेतृत्वामध्ये आज मंगळवारी बल्हारपूरात करण्यांत आले.
सदर आंदोलनात सुनील देवराव मूसळे जिल्हाध्यक्ष आप चंद्रपुर, . संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, भिवराज सोनी कोषाध्यक्ष, प्रशांत येरने चंद्रपुर महानगर अध्यक्ष, अशोक आनंदे महानगर कोषाध्यक्ष यांनी भाग घेतला. कोरोना महासंकटात रोजगार उपलब्ध नव्हता , पुर्णता रोजगार बन्द होते त्या मुळे लोकांची आर्थिक परिस्थिति हलाकीची होती , आता देखिल आर्थिक स्थीती सुधारली नाही तरी सुध्दा बल्लारपुर शहर मध्ये MSEB मार्फ़त 15 दिवसांच्या अात बिल भरा अन्यथा विज कापण्यात येईल असे नोटीस देत आहे, त्या मुळे सर्व सामान्य जनता कर्ज बाजारी होऊन सुध्दा बिल भरत आहे. तसेच महावितरण कंपनी बिल भरण्यास तगादा लावत आहे. ही तक्रार व समस्या आम आदमी पार्टी बल्लारपुर कड़े येताच या विषयाचे गाम्भीर्य लक्षात घेता बलारपुर पेपर मिल काटा घर ते नगर परिषद चौका पर्यन्त रैली काढण्यात आली. नंतर धरने आंदोलन करण्यात आले या मध्ये जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या मार्फ़त महाराष्ट्र सरकार ला आणि ऊर्जा मंत्री यांना निवदेन देण्यांत आले. वीज बिल भरण्या साठी जबरदस्ती करू नये व 4 महीन्याचे विज बिल त्वरित माफ करावे अन्यथा आप बल्लारपुर शहर जनतेला घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशाराआप बलारपुर टीमने दिला. या वेळी प्रामुख्याने कमलेश्वर देवइकर, शमशेर सिंह चौहान, सय्यद अली, अशोक नायडू, अजहर भाई, भगत सिंग आज़ाद, सुमित ताकसांडे, पवन पाल, पवन वैरागड़े, सुरेश पूजलवार, उमेश काकडे, महेंद्र अकापाका, संजय पिदुरकर, इर्शाद अली, मनीष नागपुरे, सुधाकर गेडाम, विवेक पिम्पले, दिनेश जैसवाल, जितेंद्र चंद्रा, योगेश सोयाम, रवि काम्बले, रतन भड़के, गौतम रामटेके, शुभम दुधे, तौसीफ खान, सोनू समदुलवार, संजू बोरकर, प्रनील पुड़के, प्रनील गांवड़े, अजय चिकाटे, सूर्या प्रकाश, मुनोवर अली, अरुण जीवने, अर्चना बालपांडे, नन्दा सरोदे, दुर्गा सिंगरवार, शिला वर्मा, रेखा , दीपक बहुरिया, कुंदा कापसे, सुरेश कास्तर, शिवा खरोवे, लक्ष्मण टोकलवार, भैयाजी वाघमारे, अमोल लोखंडे, सुरेश सल्मवार, श्रीनिवास रेडी, नेहा वाकड़े, आयशा देवतले, माया कैतवास, राजेन्द्र मंजू , अनिता यादव, सुनीता चन्दनखेडे, अरूणा मनोज तोड़साम, सुनीता आत्राम आदिंची उपस्थिती हाेती.