पदवीधर अंश कालीन कर्मचा-यांसाठी आम आदमी पक्षानी घेतला पुढाकार
चंद्रपूर । किरण घाटे
सोमवार दि. १ फेब्रुवारीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी-चिमूर येथील काही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी भेंट घेवून आपली व्यथा सांगितली. ब-याच वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांवर व शासकीय सेवेत सामावून घ्या अशी शासनाने अनुमती देऊनही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना रुजू केले नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
यावर उपाय निघावा म्हणून आम आदमी पक्षाचे चिमूर-नागभीड विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष डॉ .अजय पिसे हे सुरुवाती पासून या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. दरम्यान ते या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी माहिती घेत आहेत. वारंवार अर्ज करून तसेच, जिल्ह्याच्या वा-या करूनही प्रशानाकडून दुर्लक्षित झालेले हे कर्मचारी आता पुर्णता हवालदिल झालेले आहेत.
डॉ. अजय पिसे यांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलणी केली. आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांनी यांच्या या अतिशय महत्वाच्या प्रश्ना बाबत आवाज बुलंद केला आहे . त्यांनी स्वता जिल्हाधिकारी कार्यालयातून या प्रकरणाचा पूर्णपणे आढावा घेतला. त्यात असे दिसुन आले की प्रशासनाकडून दुर्लक्ष व टाळाटाळ झालेली आहे. सुनिल मुसळे यांनी सदरहु पदविधर अंशकालीन लोकांना लवकरात लवकर रुजू करून घ्यावे याबाबतची मागणी रेटुन धरली आहे.
या वेळी अधीक्षकानी या प्रकरणा बाबत लवकरात लवकर ताेडगा काढु असे तोंडी आश्वासन या वेळी दिले एवढेच नाही तर येत्या चार पाच दिवसांत ह्यावर योग्य ती कार्यवाही हाेईल असे ही ते म्हणाले. बेरोजगारीने आधीच त्रस्त झालेले हे अंशकालीन कर्मचारी शंभर कि.मी.चा प्रवास
वारंवार करू शकत नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून मेटाकुटीला आलेल्या ह्या कर्मचाऱ्यांसाठी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व जिल्हाकोषाध्यक्ष भिवराज सोनी यांनी येत्या १० दिवसांत जर या बाबत योग्य निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्व आपच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाचा बसु असा इशारा दिला आहे. आता प्रशासन यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे भेट दिलेल्या शिष्टमंडळात भीमराव बनसोड, प्रकाश पाटील, भारत बोकडे, राजेंद्र नन्नावरे, माणिक पिसे, वासनिक, प्रशांत रामटेके, राष्ट्रपाल डांगे, कचरू पाटील, बाबा मेश्राम, पोईतराम गभने व वनदेव दुधे यांचा समावेश हाेता.