बेरोजगार तरुन व शेतक-यांची अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार
कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नौक-या गेल्यात तसेच दिल्ली येथे ऐतिहासीक असे शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या दोनही पार्श्वभूमीवर आजचा बजेट बेरोजगार तरुणांसह शेतक-यांना दिलास देणारा ठरणार अशी अपेक्षा होती. मात्र सदर बजेटमध्ये रोजगार व शेतकरी या दोनही प्रमूख आणि ज्वलंत विषयांना सोयस्कररित्या बाजूला सारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यासाठी कोणतीही भरिव अशी तरतूत करण्यात आलेली नाही. त्यामूळे हा बजेट बेरोजगार तरुणांची व शेतक-यांची अपेक्षा भंग करणारा बजेट ठरला असल्याची प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर बोलतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
केवळ ठरावीक राज्यातील विधानसभा निवडणूका लक्षात घेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात महाराष्ट्राच्या पदरी मोठी निराषा आली आहे. कृषी कायद्या विरोधात शेक-यांचे आंदोलन सुरु आहे. या बजेटच्या माध्यमातून शेतक-यांसाठी भरिव तरतूद करुन त्यांचे अश्रू पूसल्या जाण्याचे काम केल्या जाईल अशी अपेक्षा होती. तसेच कोरोनामूळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात मिळविण्यासाठी रोजगार उपलब्धीसाठीही यात तरतूत असायला हवी होती. मात्र या दोनही प्रमूख विषयांकडे अर्थसंकल्पात डोळे झाक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घेषनांचा पाउस असुन यात बेरोजगार व शेतक-यांसाठी काहीही नसल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच जिवनावश्यक वस्तूचे दरात वाढ होत असतांना सोने चांदीच्या कस्टम ड्यूटीत केंद्र कपात करणार असल्याने सोने – चांदीचे दर स्वस्त तर होणार आहे. याचा फायदा केवळ व्याप-यांना होणार आहे. यात एलआयीसीचे खाजगीकरण करण्यात येणार आहे हे चुकीचे असून यामूळे शासकीय कामात पैसे जास्तीत जास्त व्याजाने मिळेल असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.