पाेलियाेला देशातुन हद्दपार करायचे असेल तर मातांनी पुढाकार घेणे गरजेचे -आ.किशाेर जाेरगेवार !
चंद्रपूर नगरीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा थाटात शुभारंभ !
🟪🟡🟩चंद्रपूर🟢🟩🟡☀️किरण घाटे🟪🟢🟩
🟪🟢वैद्यकीय यंत्रना आपले काम चोख रित्या बजावत असून योग्य जनजागृतीच्या माध्यमातून जवळपास पोलिओवर नियंत्रन मिळविण्यात आले आहे. मात्र पोलिओला देशातून हद्द पार करायचे असेल तर मातांनी पूढाकार घेत कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये असा संकल्प करावा असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
🟢🟪🟡☀️🟣आज रविवार दि.३१जानेवारीला राज्यभरासह चंद्रपूरातही पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. 🟪🟢यावेळी जिल्हा आरोग्य प्रशासन चंद्रपूरच्या वतीने या मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. 🟢🟪कार्यक्रमाला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनूले, जिल्हा शैल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांच्यासह इतर मान्यवर व आरोग्य विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.
🟢🟪🟩🟣🌀 यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलीक स्थिती पाहता येथे आरोग्याबाबत अनेक समस्या उद्भवण्याची अधिक शक्यता आहे. 🟢🟩🟣🌀🟡🟪त्यामूळे आपण स्वतासह आपल्या बाळांचीही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ही नियोजीतरित्या उत्तम पध्दतीने राबविण्यात येत असुन यात शासकीय यंत्रणांना मिळणारा लोकसहभागही कौतूकास्पद आहे. 🟢🟩🌀🟡🟪🟢याच लोकसहभागातून ही लढाई जिंकता येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. 🟪🟣🟡🟩🟩चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांच्यासह इतर मान्यवरांनी पाच वर्षा अतिल बाळांना पल्स पोलिओचा डोज पाजत मोहिमेचा शुभारंभ केला शहरात ठिकठिकाणी या 🟪🟢🟩🟡🌀माेहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आज प्रत्यक्षात दिसून आले.