संघभूमीला लाखो धम्मबांधवांचे वंदन..

0
655

संघारामगिरीत अवतरले निळ्या पाखरांचे थवे

महामानवाचा जयघोष

सम्यक क्रांतीच्या इतिहासाला साधनाभूमीतुन नव्याने उजाळा

 

प्रतिनिधी/आशिष गजभिये

चिमूर :-   ” अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंध:कारातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले.३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी ‘मूकनायक ‘ हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्रामाची सुरुवात केली होती. पिढ्यानपिढ्या आंधळ्या असणाऱ्या असणाऱ्या समाजाला समतेचा सूर्य दाखविला याच दिनाच्या ९९ व्या वर्षपूर्ती निमित्त.मागील २५ वर्षांपासून ३० व ३१ जानेवारी ला तपोभूमी संघराम गिरी येथे या धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र भारतातील लाखो धम्म बांधवानी या ऐतिहासिक भूमीत येऊन लाखो निळ्या पाखरांनी वंदन केले

सम्राट अशोकाच्या काळा पासून बौद्ध भिक्कू व उपासक उपासीकांच्या साधना अधिष्ठाण करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या साधनाभूमीत मागील २५ वर्षापासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरीता महाराष्ट्रच्या कानाकोऱ्यातुन लाखो धम्मबांधवांचे थवे दाखल झाले होते. शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री महापरित्राण पाठाकरिता कडाक्याच्या थंडीतही धम्मबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती.महास्थावीर भदंत ज्ञानज्योती यांनी अष्ठशील वदन केले.या प्रसंगी मंचकावर समारंभाचे अध्यक्ष महास्थविर शिलानंद अखिल भारतीय भिक्खू संघ व देश-विदेशातील शेकडो भिक्कू उपस्थित होते.

रविवारला समारोपीय कार्यक्रमात अस्पृश्यता मुक्ती लढ्याचे बिगुल फुंकनाऱ्या बाबासाहेबांच्या अजरामर कार्याचा व इतिहासाचे स्मरण भावी पिढीला करून देण्यासाठी सम्यक क्रांतीच्या इतिहासाला नव्याने उजाळा संघभुमीत करण्यात आला.संघरामगिरीत दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाला व निळ्या पाखरांच्या थव्यात पंचशील ध्वज होते.सर्वत्र बुद्धम शरणम गच्छामि,धम्मम शरणम गच्छामि,संघम शरणम गच्छामि…. तथागत भगवान बुद्ध व डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष सर्वत्र सुरू होता. धम्म आचरनाची शिकवण व धम्म चळवळ गतीमान करणान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या भिक्खू संघासह धम्मचळवळी ची नवी ऊर्जा अनुयायांना प्रदान करणाऱ्या संघभूमीला लाखो धम्म बांधवांनी वंदन केले.

धम्म चळवळ गतिमान करा-भदंत ज्ञानज्योती

बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षाभूमीवरील धम्मदीक्षा समारोहातून अनुयायांना सँबोधित करताना बौद्धमय भारत निर्माण करण्याच स्वप्न बघितलं होत व अनुयायांना संदेश दिला होता. त्याच स्वप्नपुर्तीसाठी तुमची जबाबदारी व समाजाप्रती असलेली जाणीव ओळखून बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी धम्म चळवळ गतिमान करा असा संदेश भिक्खू संघ,संघरामगिरी चे संघनायक महास्थविर भदंत ज्ञानज्योती यांनी उपस्थित धम्मबांधवाना दिला.

विपश्यनेतुन मानवी जीवनाचे कल्याण – महास्थविर भदंत शिलानंद

समग्र मानव जातीचे कल्याण भगवान बुद्धांच्या धम्म आचरणातून होते व त्रिशरण,पंचशील अंगिकरून एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होते.तथागतांच्या प्रणालीनुसार विपश्यना करून आपल्याला स्वतः वर नियंत्रन मिळविता येत असून अनुयायांनी विपश्यनेत सामील व्हावे,विपश्यना ही मानवी जीवनाचे कल्याण करणारी महत्त्वाची प्रणाली आहे असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष महास्थविर शीलानंद धम्मबांधवाना मार्गदर्शन करताना केलं.

 

 

प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा

धम्म समारंभाकरिता येणाऱ्या धम्मबांधवांच्या सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.वन विभागाकडून सहायक वनसंरक्षक अमोल जाधव यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी,वनकर्मचारी,वनमजुर व व्याघ्र संरक्षण दलाचे पथक तैनात केलं होते व परिसरातील गस्ती राबविण्यात आल्या. मुख्य समारंभाचे ठिकाणी पोलीस विभागा कडून ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचाऱ्यांची चमू तैनात करण्यात आलं होती.

शील व प्रज्ञेच्या प्रेरणेने जागली अख्खी रात्र

तथगताचा धम्म मानवाला वैज्ञानिक द्रुष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातुन शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते.त्या मूळे हजारो श्रावक संघरामगीरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपआपल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here