काेण ऐकणार व्यथा -काेण देणार दिलासा ! संस्थाचालकांसह मतीमंद विद्यार्थी बसले चंद्रपूरात उपाेषणाला !
🟢🟣🟡किरण घाटे इम्पँक्ट -२४न्यूज चैनल जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 🟡🟢🟣विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्या अंतर्गत येणा-या नागभिड येथील स्वामी विवेकानंद मतीमंद मुलाच्या शाळेचे अध्यक्ष मंगल पेटकर ,सचिव पुरुषोत्तम चौधरी तथा शालेय मतीमंद व अनाथ विद्यार्थीं आपल्या मागण्यां करीता चंद्रपूर जिल्ह्याधिकारी कार्यालया समाेर दि.२५जानेवारी पासून उपाेषणाला बसले अाहे .🌀🟡🟢🔷🟣🌼🔶🌼🟨दरम्यान या कडे शासनाने अद्याप लक्ष वेधले नसल्यामुळे त्यांचे उपाेषण सुरु असुन अनेकांनी त्यांचे उपाेषण मंडपाला भेटी देवून त्यांचे मागण्या जाणून घेतल्या आहे . 🟣🌀🔷🟢🟡सामाजिक जबाबदारी म्हणून १८वर्षिय खाली मंतीमंद मुलांना पुरुषोत्तम चौधरी यांनी आपल्या शाळेत दाखल करुन घेतले . १००टक्के शाळेला अनुदान मान्यता द्यावी या करीता शासन दरबारी वारंवार त्यांनी पत्रव्यवहार देखिल केला परंतु या बाबतीत शासनाने आज पावेताे कुठलाही निर्णय घेतला नाही .शासनाने एक तर नियमाप्रमाणे अनुदान द्यावे किंवा मतीमंद मुलांचे स्थानांतर दुस-या शाळेत करावे .संस्था चालकावर कर्जाचा बाेझा अधिक वाढल्यामुळे आपली संस्था शेवटची घटका माेजत असल्याचे त्यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या एका निवेदनात नमुद केले आहे .🟡🌀🔷🟣🟢गेल्या दिड दशकापासून स्वामी विवेकानंद शाळा सुरु असुन या संस्थेला आज पावेताे शासनाचे कुठलेही अनुदान प्राप्त झाले नाही .🟣💠🟡🌀🟨🟩🌀🔷शासनस्तरावर या बाबतीत याेग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा पुरुषोत्तम चौधरी यांनी दिला आहे .🟡🟢🌀🟨🟣🔷आज उपाेषणाचा ६वा दिवस असुन शासनाने या कडे लक्ष पुरवून याेग्य ताेडगा काढावा अशी अपेक्षा सर्वस्तरांवरुन व्यक्त हाेत आहे