आश्वासनाची पूर्तता नाही -यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन चंद्रपूर कंत्राटी घंटागाडी कामगारांची मनपा कार्यालयावर धडक !

0
863

आश्वासनाची पूर्तता नाही -यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन चंद्रपूर कंत्राटी घंटागाडी कामगारांची मनपा कार्यालयावर धडक !

🟩🟪किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟩🟣गेल्या कित्येक दिवसांपासून चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यांचे काम कंत्राटी (घंटागाडी )कामगार करीत आहे .परंतु त्यांचे रास्त मागण्यांची पुर्तता अद्याप झाली नाही . 🟣🟢🌼🟡जानेवारी २०२१पासून चालू किमान वेतन मिळावा या प्रमुख मागणी साठी काल बुधवार दि.२७जानेवारीला यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमांतुन शहरातील महा नगरपालिका कार्यालयावर त्यांनी धडक देत काही तास त्या ठिकाणी घोषणा देत ठिय्या आंदोलन केले .🟣🟡💠🌼🟩दरम्यान त्यांचे रास्त मागण्यांचे एक निवेदन चंद्रपूरचे विद्यमान आमदार तथा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशाेर जाेरगेवार यांचे वतीने जितेश कुळमेथे , विमल काटकर , दुर्गा वैरागडे , आशा देशमुख , वैशाली रामटेके , राम जंगम , आनंद रजशुर , राहुल माेहुर्ले यांनी काल सायंकाळी ५वाजता मनपा आयुक्त यांना सादर केले .🟣🟪🟡🔶🟥काेराेनाच्या काळात स्वताचा जिव धाेक्यात टाकुन कंत्राटी घंटागाडी कामगार यांनी आपले कर्तव्य प्रामाणिक पार पाडले .त्यांचे रास्त मागण्या संदर्भात या पूर्वि मनपाने त्या बाबतीत याेग्य ताेडगा काढु असे आश्वासन देखिल दिले पण अद्याप या मागण्यां संदर्भात निर्णय झाला नाही .🟣🟡🟪🟢🟩येत्या १फेब्रुवारी पर्यंत मागण्यांची परिपुर्तता झाली नाही तर ८तारखेपासून बेमुदत संप पुकारण्यांचा इशारा मनपाला एका निवेदनातुन देण्यांत आला आहे 🟣🟡🟢💠🟪सदरहु निवेदनाच्या प्रति चंद्रपूरचे जिल्हाधिकारी , पाेलिस अधिक्षक , व सहाय्यक कामगार आयुक्त यांना सादर करण्यांत आले असल्याचे यंग चांदा ब्रिगेड आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी काल या प्रतिनिधीस सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here