आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण
जनसंपर्क कार्यालय येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी/सदानंद खंडारे
अमरावती । दिनांक २७ जानेवारी : रेल्वे स्टेशन ते बस स्थानक मार्ग स्थित आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. याप्रसंगी आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असता, सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगान करून तिरंग्याला मानवंदना दिली. याप्रसंगी आ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहरवासीयांना ७२ व्या गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधान अंमलात आले. व आपल्या भारताचा राज्यकारभार सुरु झाला. संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय हि लोकशाहीची मूल्ये आपण अंगिकारली पाहिजे, व लोकशाही अधिक बळकट केली पाहिजे, असे प्रतिपादन आ. सुलभाताई खोडके यांनी केले. दरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी वाटप करून सामूहिक वाचन देखील करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी आम्ही भारताचे लोक अशी संविधानाची उद्देशिका वाचून अंगीकृत केले. याप्रसंगी सर्वांगीण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल सर्वश्री रामदास इमले, प्रमोद सांगोले, योगेश सवई आदी मान्यवरांचा आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते यथोचित सत्कार सुद्धा करण्यात आला. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, अशी घोषणांनी परिसर दणाणला होता. सर्वजण देशभक्तीच्या भावनेने ओतप्रत झाले असल्याने यावेळी प्रजासत्ताक दिनाचा आनंद व उत्साह दिसून आला. या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, माजी महापौर विलास इंगोले , ऍड . किशोर शेळके, मनपा विपक्ष नेता बबलु शेखावत , माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, नगर सेवक प्रशांत डवरे , यश खोडके, अंजली केवले, योगिता सांगोले, ममता आवारे, अंजली चौधरी, गजानन बरडे , संजय बोबडे , किशोर भुयार ,पप्पू खत्री ,अशोक हजारे , किशोर देशमुख , अजय दातेराव , महेंद्र भुतडा , मनीष देशमुख , सुनील रायटे , दिनेश देशमुख , नितीन भेटाळू , मनोज केवले , श्रीकांत झंवर , महेश साहू , ऍड . सुनील बोळे ,प्रमोद महल्ले , योगेश सवाई ,प्रवीण भोरे, मनीष करवा , जितेंद्र ठाकूर , मनीष बजाज ,माजी नगरसेवक रतन डेंडुले , लकी नंदा , प्रवीण मेश्राम , गजानन राजगुरे , मनोज उर्फ राजू भेले , रवींद्र इंगोले , गुड्डू धर्माळे ,निलेश शर्मा , धीरज श्रीवास , प्रमोद सांगोले ,दिलीप कडू ,निलेश गुहे , विजय बाभुळकर प्रवीण पारडे , प्रशांत पेठे , बंडू निंभोरकर , ऍड . शोएब खान ,सनाभाई ठेकेदार , गाजी जाहेरोश , सनाउल्ला सर , नदीमुल्ला सर ,हबीबभाई ठेकेदार , अफसर बेग , सय्यद साबीर , रफ्फु पत्रकार , फारुखभाई मंडप वाले , अबरार भाई , साबीर पहेलवान , ऍड. शब्बीर , मेराजखान पठाण , रेहान शेख ,आहद भाई , फहीम मेकॅनिक , वहीद खान , सादिक राजा, मोहहम्द शारिक , परवेझ खान , अफझल चौधरी , हब्बू भाई , गुड्डू हमीद , दिलबर शाह , बिलाल खान , सादिक शाह , असिफ भाई , तनवीर आलम , भुरू भाई , जहाँगीर नंदावाले, योगेश सवई ,आदी सहित कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.