क्रिकेटचा देव ताडोबाच्या वाघांच्या भेटीला
भारतरत्न सचिन तेंडुलकर सहकुटुंब ताडोबात
तीन दिवस खासगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी
आशिष गजभिये
चिमूर.
क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली व मुलगी सारासह ताडोबात दाखल झाले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये सोमवारी त्यांचे आगमन झाले आहे.
सोमवारी दुपारी दाखल झालेले सचिन व त्याचे कुटुंबिय अलिझंजा या राखीव वनक्षेत्रात सफारीला गेले.क्रिकेटचा देव अशी ओळख असलेले सचिन जेव्हा केव्हा विदर्भात दाखल झाले तेव्हा त्यांना व्याघ्रदर्शनाचा मोह आवरला नाही.मागील दोन वर्षांच्या काळापासून ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ताडोबाच्या जंगलात दाखल होत आहेत.सॊमावरी सकाळी त्याचे नागपूरला आगमन झाल्यानंतर ते दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यात दाखल झाले.
काही तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी त्यांनी अलिझंजा गेट येथून प्रवेश करीत सफारीकरिता गेले. कोविड-१९ च्या प्रादुर्भाव कमी होताच देश-विदेशातील पर्यटक ताडोबात दाखल होत असून देशभरातील नामवंत व्यक्तींना येथील वाघांनी भुरळ पाडली आहे.सचिन यांचा हा दौरा खासगी असून त्यांच्या या दौऱ्याबाबत प्रशासनाने गुप्तता पाडली असून कडेकोट सुरक्षा प्रबंध केला आहे.
झरणीच्या व बछड्याचे दर्शन
खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या अलिझंजा गेट परिसरातून त्यांनी सफारी केली असता जोगा मोगा परिसरात त्यांना झरणी नामक वाघिण व तिच्या चार बछड्याचे ,बिबट ,अस्वल आदी वन्यप्राण्यांचे त्यांना दर्शन झाले आहे.