महसूल पथकाची कारवाई ; दाेन ट्रँक्टर जप्त
चंद्रपूर।किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप काेणतेही रेती घाट लिलाव झाले नाही. शहरी भागांसाेबतच ग्रामीण भागात घरांचे बांधकाम सुरु आहे .एका रेती ट्रँक्टरची किंमत अंदाजे चार ते पांच हजारच्या घरात पाेहचली असल्याचे सर्वत्र बाेलल्या जाते.
माेठ्या हिंमतीने रेती तस्कर दिवसा किंवा रात्री रेती घाटांवरुन रेती नेण्यांचा प्रयत्न करीत असले तरी रेती माफियांच्या विराेधात महसुल विभाग व खनिकर्म विभागाने कंबर कसल्याचे एकंदरीत दिसून येते.
चंद्रपूरचे एसडीआे राेहन घुगे तथा तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी किशाेर नवले यांनी आपल्या महसुल पथकाला साेबत घेवून शुक्रवारी मार्डा येथे दाेन रेती ट्रँक्टरला दंडात्मक कारवायांसाठी ताब्यात घेतल्याचे व्रूत्त आहे.
चंद्रपूरातील महसुल विभाग व खनिकर्म विभाग सातत्याने रेती तस्करांवर नजर ठेवून आहे व गुप्त माहितीच्या आधारे कारवायां देखिल करीत असल्याचे प्रत्यक्षात दिसत आहे .