मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर च्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

0
698

मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर च्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर, जिल्ह्यातील निवळक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे, मॅजिक बस च्या माध्यमातून 12 ते 16 वयोगटातील विद्यार्त्यांसाठी खेळाच्या माध्यमातून, शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम स्केल (SCALE) कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील 2554 विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रम राबवित आहे.

त्याच अनुशंगाने मॅजिक बस इंडिया फौंडेशन च्या वतीने आज दि 22 जानेवारी 2021 ला गट संसाधन केंद्र बामणी बल्लारपूर येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला बल्लारपूर तालुक्यातील एकूण सतरा शाळेतील मुख्याध्यापक तथा सहाय्यक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाचा उद्देश म्हणजेच
मॅजिक बस इंडिया फौंडेशन च्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील सतरा शाळेत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य, हा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमात शिक्षण, जीवन कौशल्य, रोजगार कौशल्य, गावाचा व शाळेचा विकास हे शिकवून नवीन सुजाण सुशील पीडी निर्माण करून बाल मजुरी बाल विवाह प्रतिबंध असे नवीन उपक्रम राबवून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न मॅजिक बस करीत आहे,
त्या साठी समाजातल्या प्रत्येक घटका सोबत मॅजिक बस खेळातून विकास, शिक्षण, जीवन कौशल्य हा उपक्रम राबवित आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या मा. सौ. ,मडावी मॅडम विस्तार अधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपुर तालुक्यातील सतरा शाळेतील मुख्याध्यापक हे उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम मा. सौ. फुलझेले मॅडम गटशिक्षणाधिकारी बल्लारपूर यांच्या निदर्शनात व मॅजिक बस चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री , प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात पार पाडण्यात आला तर या कार्यक्रमाचे संचालन मा.प्रतीक दुर्गे सर शाळा सहाय्यक अधिकारी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅजिक बस चे मा. श्री, नितेश मालेकर सर तालुका समन्वयक यांनी केले तर ही कार्यशाळा मॅजिक बस चे मा.संदेश चुनारकर सर शाळा सहाय्यक अधिकारी यांनी घेतली व ही कार्यशाळा पार पाडण्यासाठी मॅजिक बस चे समुदाय समन्वयक कु. आकाश सोयाम, कु. प्रीती नेवारे, संगीता मोरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here