राज्यात वंचितचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी तर २८० ग्रामपंचायतीवर वंचितची एक हाती सत्ता
मुंबई,दि. २१ – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी झाले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा राज्यात ग्रामपंचायतवरती विजय मिळवणारा मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दिल्लीत झालेल्या शाईन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत माहिती दिली राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन हजार ७६९ उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचितने एक हाती सत्ता मिळवली आहे. ही सर्व माहिती आकडेवारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा, तालुकास्तरावर घेतलेल्या अधिकृत माहितीवरून पत्रकारांना देण्यात आली आहे.
सुरेश नंदिरे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी
9867600300