रस्ता बांधकामाच्या कामामुळे होणाऱ्या बेघर परिवारांना पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत मनसे आक्रमक.

0
783

रस्ता बांधकामाच्या कामामुळे होणाऱ्या बेघर परिवारांना पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत मनसे आक्रमक.

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिले निवेदन.

 

प्रतिनिधी/सदानंद आ खंडारे

 

अमरावती : कुठलीही पर्यायी व्यवस्था न देता सरळ बुलडोजर चालवून घरे पाडु पाहणाऱ्या अधिकारयांचा डाव मनसे शहर अध्यक्ष गौरव बांते यांनी उधलुन लावल्यानंतर आज सर्व मनसे पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक आणि नागरिकानी प्रशासनकडे धाव घेतली.संकटग्रस्त लोकांच्या व्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडून निकृष्ठ रस्ता बांधकाम करणाऱ्या या कंपनीवर आणि अधिकारयंवर विशेष समिति च्या चौकशीचीच्या आधारे योग्य कार्यवाहीची मागणी केली.त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व मनपा आयुक्त यांना सुद्धा भेटून याबाबतीत अवगत केले.
कुठलीही ठोस उपाययोजना न करता फक्त घरे तोड़नर असतील तर प्रशासनासोबत जनसंघर्ष करण्याची तयारी असल्याचा आक्रमक पवित्रा मनसे ने घेतला आहे.
यावेळी मनसे महानगराध्यक्ष संतोष बद्रे,शहर अध्यक्ष गौरव बांते, शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर,नितेश शर्मा,शहर सचिव निखिल बिजवे,रावेल गिरी,राजेश ढोरे,हरीश तुमरे,सतीश साबले, मनीष दीक्षित, राजेश धोटे,सूरज बर्डे,हर्षल ठाकरे,ऋषि पाटिल,गौरव वेरुलकार,अजय चोराआमले,रोशन तुमसरे,गौरव इंगले,अंकुश पडोळे, सौ.वर्षा इंगले,सौ.संगीता कावरे, सौ माया फुलबंधे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here